ST Workers Strike Pune | पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी संपाचे (ST Workers Strike Pune) हत्यार उपसले आहे. राज्य सरकार यावर मार्ग काढणार असल्याचे सांगून देखील एसटी कर्मचारी आपल्या संपावर (ST Workers Strike Pune) ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspension) करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यात (Pune) काल कर्मचाऱ्यांकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर आज सकाळी स्वारगेट एसटी स्टॅन्डवर (Swargate ST Stand) कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन आंदोलन (shave Agitation) केले.

 

राज्य सरकारकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी संप  सुरु ठेवला आहे. कोरोना काळात मागील दीड वर्षात एसटीला जवळपास 7,951 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यातच आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचलेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता चांगलाच चिघळला आहे.

 

 

राज्यात बुधवारी दिवसभरात 250 आगारांपैकी 250 आगार बंद पडले आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी 100 कोटी रुपयांचा फटका एसटीला बसला आहे. तर संपामुळे दररोज 13 कोटी रुपयांचा महसूल (Revenue) बडाला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बाहेर गावी गेलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सरकारने खासगी वाहनांना (private vehicle) प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

 

Web Title :- ST Workers Strike Pune | employees shave swargate st stand pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा