ST Workers Strike | लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार; 70 टक्के ST कामगार डेपोत हजर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा (MSRTC Workers) राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु होता. दरम्यान त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला. हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) एसटी कामगारांना कामावर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. मात्र काही एसटी कामगारांनी कामावर हजर न राहता राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak Attack Case) निवासस्थानी हल्ला केला. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले.

 

हाय कोर्टाकडून (Bombay High Court) एसटी कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर, पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर कामगारांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना अटक (Arrested) करण्यात आले. त्यानंतर, कामगारांनी आपला मोर्चा आता डेपोकडे वळल्याचे दिसून येतेय. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) चोपडा आगारात (Chopra Depo) 70 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. (ST Workers Strike)

 

हाय कोर्टाच्या आदेशानंतर आता एसटी कामगार कामावर हजर होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश डेपोतील कामगार-कर्मचारी आता लाल परीच्या सेवेत दाखल झाले आहेत. एकीकडे भरकटलेला संप आणि दुसरीकडे कोर्टाचा आदेश, या दोन्हींकडे पाहता कामगार पुन्हा कामावर हजर होत आहेत. त्यामुळे आता लालपरी रस्त्यावर धावताना दिसत आहे.

चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर (Sandesh Kshirsagar) यांनी सांगितले की,
”ऐन दिवाळीत राज्यातील बहुतांश एसटी आगारात बसची चाके थांबली होती.
कालांतराने काही कर्मचारी हजर झाल्याने राज्याची लालपरी रस्त्यावर धावू लागलीय.
आता हाय कोर्टाने आदेश दिल्यानंतर चोपडा आगारात 368 पैकी 229 म्हणजेच साधारण 70 टक्के कर्मचारी हजर झाले असून
17 हजार किलोमीटर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्यात. तसेच, लांब पल्ल्याच्या,
मध्यम पल्ला आँर्डेनरीच्याही फेऱ्या सुरू आहेत. तर, विद्यार्थ्यांच्या फेऱ्या,
ग्रामीण भागाचे मुक्काम आणि सर्व फेऱ्या 22 तारखेच्या आत सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

 

Web Title :- ST Workers Strike | st bus started running on the road again 70 per cent msrtc workers depot attendance in chopda jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा