ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटीच्या संपात (ST Workers Strike) सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने (MSRTC) बडतर्फीची, कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या (suspention) कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात (Labor Court) तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर (Latur) व यवतमाळ (Yavatmal) येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या (ST Workers Strike) कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

 

लातूर आणि यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये (ST Workers Strike) सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी दोषारोप पत्र (Charge sheet) दाखल करुन, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून (State Transport Service) बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.

या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचारी यांनी कामगार न्यायालय, लातूर आणि यवतमाळ यांच्याकडे तक्रार (ULP) दाखल केली होती.
या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार (Refusal of adjournment) दिला.
कामगार न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता कामावर हजर न झालेल्या कामगारांच्या समस्यांसमोर वाढ झाली आहे.
राज्यातील इतर ठिकाणी अशा प्रकारे बडतर्फीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- ST Workers Strike | st strike labor court refusal to adjourn the suspention of st employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MahaTET Exam Scam Case | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण ! तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयात आणखी मोठं घबाड सापडलं

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा विजा कडाडणार, नववर्षाआधी राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Sudhir Mungantiwar | ‘महाविकास आघाडी सरकार बाराही महिने झोपतं, यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, ‘रिश्ते में ये हमारा बाप लगता है’ – सुधीर मुनगंटीवार

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात पुन्हा निर्बंध ! ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आज नवीन नियमावली जाहीर होणार