ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा (MSRTC) राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरू आहे. यामुळे राज्यात एसटीची कमतरता भासल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ होतेय (ST Employees Strike) . आता मात्र मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशाप्रकारे संप न करण्याच्या सुचना देखील हाय कोर्टाकडून देण्यात आल्या असून राज्य सरकारलाही (Maharashtra State Government) कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (Bombay High Court)

 

न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने (Three Member Committee) केलेल्या इतर शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात मंगळवारी दिली. त्यावर, महामंडळाने याचिका दाखल केली आणि न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. समिती नेमली, दोन्ही पक्षांचे हित लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ. तत्पूर्वी आम्हाला कामगारांच्या वकिलांचे म्हणणे ऐकायचे असल्याचं हाय कोर्टाने मंगळवारी म्हटले होते. (ST Workers Strike)

 

यानंतर आता कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे सूचवले आहे.
त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि ग्रॅज्युएटीवरही कुठलाही परिणाम न होऊ देण्याचे निर्देश देखील हाय कोर्टाकडून महामंडळाला (MSRTC) देण्यात आले आहे.
दरम्यान, आता राज्यात 22 एप्रिलपासून लालपरी पुन्हा जोमाने धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :-  ST Workers Strike | st strike st employees to report for work by april 22 high court directs msrtc employees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा