ST Workers Strike | कोर्टाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MSRTC चे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Workers Strike) चर्चा करण्यासाठी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) बैठक झाली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. जो पर्यंत यामध्ये तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रश्नावर उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे.

 

एसटीचे राज्य शासनाच्या (Maharashtra government) सेवेत विलिनीकरण (MSRTC Merger) करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील 15 दिवसांपासून संपावर गेले आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीला 12 आठवड्यात आपला अहवाल सदार करायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल असेही अनिल परब यांनी सांगितले.

 

दोन पावलं मागे घ्या

कामगारांनी (ST Workers Strike) अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे.
तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग काढू असं सांगतानाच कामगारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.
तसेच या संपात कोणतंही राजकारण केलं जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

 

आज सह्याद्री अतिथीगृह येथे संपाबाबत झालेल्या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब,
एसटी कर्मचारी शिष्टमंडळ, आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे उपस्थित होते.

 

Web Title :- ST Workers Strike | st workers strike anil parab appealed employees should call off the strike striving for an alternative settlement MSRTC Marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा करणार ‘या’ पदांसाठी मुंबई, नागपुरात बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर

Diego Maradona | दिवंगत फुटबॉलपट्टू दिएगो मॅराडोना यांच्यावर क्युबाच्या महिलेकडून अत्यंत गंभीर आरोप

MP Vinay Sahsrabuddhe | भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले – ‘वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं’

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

PMJJBY | अवघ्या 330 रूपयाच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाखाचा विमा, तुम्ही घेतला का मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ?