ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एस टी कामगारांच्या वेतनात ४१ टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता एस टी कामगारांनी एक पाऊल मागे घेत आझाद मैदानावरील आंदोलन (ST Workers Strike) स्थगित केले आहे. आमदार गोपीनाथ पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी आंदोलन मागे (ST Workers Strike) घेत असल्याची घोषणा केली असून विलिनीकरण होईपर्यंत लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

एस टी कर्मचार्‍याचे शासकीस कर्मचार्‍यांमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन (ST Workers Strike) सुरु आहे. आझाद मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील एस टी ची वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनात मुख्य तिढा हा विलिनीकरणाचा होता. त्यावर तात्पुरता तोडगा म्हणून राज्य सरकारने एस टी कर्मचार्‍यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच दर महिन्यांच्या १० तारखेपर्यंत कर्मचार्‍यांचे पगार होईल, याची हमी सरकारने घेतली आहे. तसेच समितीच्या अहवालानंतर विलिनीकरणावर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर आता कामगारांशी चर्चा करुन गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.

जे पदरात पडतेय ते घेऊन पुढे जायचे आहे. लढाईतील पहिला टप्प्यात आम्ही जिंकलो आहेत. विलिनीकरणाचा निर्णय घेण्यास वेळ लागणार असल्याने आता तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे पडळकर यांनी सांगितले. आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी राज्यभरातील कर्मचारी हे मान्य करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title : ST Workers Strike | st workers strike bjp mla gopichand padalkar calls end strike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या