ST Workers Strike | एसटी कामगारांचा संप मिटेना ! कमतरता भरून काढण्यासाठी ST महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही कर्मचारी कामावर दाखल देखील झाले आहेत. तर उर्वरित कामगार अद्याप कामावर रूजु झाले नाहीत. कामगार संपावर ठाम असल्याने राज्य सरकारने (Maharashtra State Government) देखील मोठा निर्णय घेतला आहे. (ST Employees Strike)

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे. राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे. दरम्यान, चालंकाची भरती होत असताना कंडक्टर्सची देखील कमतरता जाणवत आहे. त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवरून कारवाया मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आवाहन केले जाते. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
तसेच याव्यतिरिक्त एसटीमध्ये आणखी 2 हजार चालकासह कंत्राटी पद्धतीने भरती होणार असल्याचे समजते.

 

Web Title : ST Workers Strike | st workers strike continues now direct st employees recruitment begins msrtc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !