Homeताज्या बातम्याST Workers Strike | आज रात्रभर 'विचारमंथन', उद्या सकाळी संपकऱ्यांची भूमिका स्पष्ट...

ST Workers Strike | आज रात्रभर ‘विचारमंथन’, उद्या सकाळी संपकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर (ST Workers Strike) आज दिवसभरात बैठकांचे सत्र सुरु होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike ) मिटावा म्हणून राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या मूळ वेतनात वाढ (basic salary Increase) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज चर्चा करणार आणि उद्या यावर भूमिका स्पष्ट करणार असं आमदार सदभाऊ खोत (MLA Sadbhau Khot) यांनी जाहीर केलं आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike ) तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray government) ऐतिहासिक पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणाबाबत हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ असं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन गुरुवारपासून कामावार हजर राहावं असं आवाहन केले आहे. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) जात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

 

यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत म्हणाले, सरकारसोबत आज आमची बैठक झाली. मात्र कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर चर्चा करु. आजचा मुक्काम आझाद मैदानात करु उद्या संपावर निर्णय घेऊ. सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं आम्ही पत्रकार परिषदेत सांगितले. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी वेगळं मत मांडू नये. जो निर्णय घ्यायचा आहे तो विचार करुन घ्यायचा आहे. सकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.

 

कर्मचारी विलिनीकरणावर ठाम

आम्हाला पगारवाढ नाही तर विलिनीकरण पाहिजे. पगाराची खात्री नाही म्हणून विलिनीकरण करावं हीच मागणी ठाम आहे.
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. पगारवाढीला आमची मान्यता नाही.
42 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या (Suicide) झाल्या तरी सरकार कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे, असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | st Workers strike lets take decision tomorrow sadabhau khot gopichand padalkar announcement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News