ST Workers Strike | आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. अशातच आता नांदेडमधील (Nanded) एका एसटी कामगाराला भोवळ आल्याने तो संप ठिकाणीच पडला होता. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या कामगाराचा आज दुर्देवी मृत्यू (Died) झाला आहे. दिलीप वीर (Dilip Veer) (वय, 50) असं नांदेड आगारातील मृत वाहकाचे नाव आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या कामगारांनी मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला आहे. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी, एसटी कामगारांच्या संपामुळे नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काल (गुरुवारी) दिलीप वीर (Dilip Veer) यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. परंतु, ते हजर झाले नाही. आपल्यालाही आता निलंबित केले जाईल या तणावात ते होते. कुटुंबातील लोकांनाही त्यांनी याबाबत सांगितले होते. मागील अनेक दिवसापासून ते तणावात होते. दिलीप यांना दोन मुलं दोन मुली आहेत. (ST Workers Strike)

काल दिलीप हे बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आले होते. सायंकाळी अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आंदोलन स्थळावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सूरु असतांना आज (शुक्रवारी) सकाळी त्यांचा मृत्यू (Died) झाला. ही बातमी कळताच बसस्थानकात मोठ्या संख्येने कर्मचारी जमले. मृत दिलीप वीर यांचा मृतदेह बस स्थानकात आणून ठेवण्यात आला.

 

दरम्यान, या ठिकाणी राज्य शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शासनाने विलीनीकरणाची मागणी मान्य करावी. मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबाला तातडीने 50 लाख रुवयांची रोख मदत करावी.
जोपर्यत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली.
दरम्यान, नांदेडमध्ये अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | st workers strike one more employee died he was fall during agitation in nanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार