ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी धरली परतीची वाट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Government) विलीनीकरण करावे यासाठी गेल्या पाच – सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीने स्पष्ट केल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कामावर रुजू होण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर परत येऊ लागले आहे. मंगळवारी सुनावणी होती. त्यामुळे आझाद मैदानात 10 हजारांच्या आसपास कर्मचारी होते. मात्र बुधवारी ती संख्या तीन हजारवर आली. (ST Employees Strike)

 

एसटी (ST) बंद असल्याने ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नोकरदार, शेतकरी, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर एसटी अभावी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. महामंडळाकडे 16 हजार बस असून त्यापैकी केवळ 4 हजार 900 बस धावत आहेत. धावणाऱ्या बसच्या 14 हजार फेऱ्या होत असून दिवसाला 10 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. तरीही ही सेवा अपुरी पडत आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जे कर्मचारी हजर राहणार नाही त्यांच्यावर कारवाईसाठी महामंडळ प्रशासनाला मुभा राहणार आहे. (ST Workers Strike)

यासंदर्भात बोलताना एसटी कर्मचारी म्हणाले, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहेत.
मात्र, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली नाही.
कामावर घेताना त्यांनी ताकीद दिली आहे.
न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यावरील कारवाईला संरक्षण मिळेल.
तर अन्य काही कर्मचारी बोलताना म्हणाले की, गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.
न्यायालयाने कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत.
याबाबतचा योग्य निर्णय घेण्यापूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले.

 

Web Title :- ST Workers Strike | st workers waited for return only three thousand workers at azad maidan msrtc employees strike

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा