ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची चिन्हे, ‘इथं’ 4 बसवर दगडफेक; चालक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला (ST Workers Strike) झुगारुन धुळे बस आगारातून (Dhule bus depot) आज (रविवार) बस सेवा सुरु (Bus service start) करण्यात आली. सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस धुळे आगारातून पोलीस बंदोबस्तात नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवण्यात आल्या. परंतु पोलीस बंदोबस्त असतानाही चार बसेसवर दगडफेक (Stone throwing) झाली आहे. या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनेमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धुळे बस आगारातून पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरु करण्यात आली. असे असतानाही अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक चालक जखमी (Bus  Driver injured) झाला आहे. नरडाणा येथून धुळ्याकडे येणाऱ्या बसवर नगावबारी येथे अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेत विजय भामरे (Vijay Bhamre) हे बस चालक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी बस चालकांकडून करण्यात येत आहे.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु असताना बस सोडल्यातर अनुचित प्रकार घडण्याची भीती पोलीस यंत्रणेला होती.
त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली होती.
मात्र या बसेसच्या मार्गाबाबत आणि संख्येबाबत आगार प्रमुखांकडून पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आगार प्रमुखांना बस सोडण्याचे मार्ग आधी कळवावेत अशी सूचना केली आहे.
मात्र दगडफेकीच्या घटनेनंतर सुरु झालेली बस सेवा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | stone pelting on four msrtc buses in dhule marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा