ST Workers Strike | आतापर्यंत एसटीचे 2053 कर्मचारी निलंबीत, पुण्यातील कर्मचार्‍यांचं मोठं नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नसून कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु संपकरी कर्मचारी संप (ST Workers Strike) मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने कारवाई सुरु केली आहे.

 

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारला आहे.
परंतु कायद्याने हे शक्य नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे काही अवधीही मागितला आहे.
परंतु एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 2053 संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspension) करण्यात आले आहे.

ST Workers Strike | suspension of 2053 employees of st worker

 

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी पुण्यातील (Pune) आहेत. पुण्यातून 138 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून यानंतर ठाण्यातून
(Thane) 73 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
निलंबनानंतर आता कायमस्वरुपी कामावरुन काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करुन संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरी गमवावी लागणार असल्याचे चित्र आहे.

 

Web Title : ST Workers Strike | suspension of 2053 employees of st worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus | चीनमध्ये कोरोनाची दहशत ! बंद होऊ लागले मॉल-हौसिंग कॉम्प्लेक्स, महामारीचा कहर पुन्हा सुरू!

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,016 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Legislative Council Elections | शिवसेनेकडून सचिन अहिर, वरूण सरदेसाई, सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकर यांची नावे विधानपरिषदेसाठी आघाडीवर