ST Workers Strike | संपकरी एसटी कामगारांना दणका ! मंत्री अनिल परब यांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील दोन महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप (ST workers strike) सुरु आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी एसटी कामगार ठाम आहेत. राज्य सरकारने (Maharashtra Government) संपकरी कामगारांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. यानंतर आज (सोमवारी) अधिवेशना दरम्यान बोलताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ती मागे घेतली जाणार नाही,’ असं स्पष्टंच अनिल परब यांनी सांगितलं आहे.

 

यावेळी बोलताना अनिल परब (Anil Parab) म्हणाले, ‘जे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावरील बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांविषयी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उत्तर देताना अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, ती आता मागे घेतली जाणार नाही. (ST Workers Strike)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील नुकतंच एसटी महामंडळ (MSRTC) विलीनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ‘प्रत्येकाने विलीनीकरणाचा हट्ट केला तर हे शक्य नाही. पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की. पगाराची हमी आम्ही घेतली आहे. 10 तारखेच्या आत पगार मिळणार आहे. कॉलेज सुरू झालंय, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे,’ असं ते म्हणाले होते. तसेच त्यांनी विलीनीकरणाच्या मागणीला स्पष्टपणे नकारही दिला होता.

 

Web Title :- ST Workers Strike | the action taken against the employees MSRTC will not be withdrawn say anil parab

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने

 

Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन

 

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

 

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

 

Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या