विद्यापीठात तरुण-तरुणीवर चाकूने वार, FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात मैदानावर गप्पा मारत बसलेल्या तरुण-तरुणीवर सायकलच्या किचनच्या चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाहरुख शेख (वय २३, दापोडी) यांने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अनोखी सायकल स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि त्याची मत्रीण सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात मैदानावर सायंकाळी गप्पा मारत बसले होते. यावेळी सायकलवरून एकजण येथुन जात होता. त्याच्याकडे पाहून मैत्रीण शेख याला काही तरी बोलली. त्यामुळे तो माझ्या कडे पाहून काय बोलता असे म्हणाला.

यावरून शेख व त्याच्यात वाद झाले. शेख याने त्याचा भाऊ अझर शेख याला बोलावून घेतले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने किचनला असणाऱ्या छोट्या चाकूने तिघांवर वार केले. यात मैत्रीण आणि दोघे भाऊ जखमी झाले आहेत. वाद झाल्यानंतर तिघेही येथून निघून गेले. काही वेळाने त्यांना आपल्याला गंभीर जखमा झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस त्या सायकल स्वार आरोपीचा शोध घेत आहेत.

Visit : Policenama.com