सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, पदवीधरांना ‘या’ पदांसाठी करता येणार ‘अर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने ज्युनिअर ट्रान्सलेटर, ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर आणि हिंदी प्राध्यापक या पदासाठी भरती सुरु केली आहे. इच्छिक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून उमेदवार अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. यासाठी www.ssc.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या संबंधित लवकर नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल.

SSC सुरु करणाऱ्या या भरती प्रक्रियेत हिंदी प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवधीर असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनिअर पदांसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नको. तसेच वयात सूट असलेल्या उमेदवारांची माहिती आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर आहे.

अर्ज करण्यासाठी तारीख –

कम्बाइन ग्रेज्युएट लेवल परिक्षा टियर – 1
नोटिफिकेशन जाहीर होण्याची तारीख – 31 ऑक्टोबर 2019
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 28 नोव्हेंबर 2019
लवकरच परिक्षेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल.

संभाव्य तारखा –
कम्बाइन ग्रेज्युएट लेवल परिक्षेची तारिख – 29 डिसेंबर 2019
ज्युनिअर इंजिनिअर परिक्षेची तारीख – 29 डिसेंबर 2019
स्टेनोग्राफर ग्रेड – C आणि D परिक्षेची तारीख – 17 सप्टेंबर 2019

आरोग्यविषयक वृत्त –