शिळी भाकर अन् चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क, या आजारांपासून बचाव करण्यासाठी जरूर करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिळी भाकरी किंवा चपाती खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेतले तर अशा चपात्या, भाकऱ्या पाहिल्यानंतर आपण तोंड वाकडं करणार नाही. आजार रोखण्यासाठी त्या खाणे आवश्यक आहे. बहुतेक लोक शिळी भाकरी, चपाती ऐकून तोंड वाकडं करतात. परंतु, केवळ चव घेण्याऐवजी आरोग्याचा विचार केला तर शिळ्या भाकरी व चपातीत पोषण मूल्य अधिक असते. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की गव्हाच्या पीठाची चपाती हे सर्वात पौष्टिक आणि पचण्याजोगे अन्न मानले जाते. परंतु ती शिळी बनली की गुण आणखी वाढतात. चला, जाणून घ्या शिळी भाकर, चपाती खाण्याचे फायदे –

शिळी भाकरी दररोज दुधासह खाण्याने मधुमेह आणि बीपी, रक्तदाब नियंत्रित राहतो. चपाती, भाकरी शिळी असते तेव्हा फायदेशीर जिवाणू तयार होतात. ग्लुकोजच्या पातळीत घट येते. शिळ्या भाकरीच्या, चपातीच्या खाण्याने देखील पोटाच्या आजाराला आराम पडतो. शिळ्या चपाती, भाकरीमुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचन सुध्दा सुधारते. शिळी भाकरी शरीराचे तापमान संतुलित राखण्यात उपयुक्त आहे. दुधासह शिळी भाकर खाण्यामुळे शरीर तापमान नियमन होण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्यात, हाय स्ट्रोक म्हणून समस्येचा धोका उद्भवू शकत नाही. दूध भाकरी खाण्याने देखील शरीराच्या अशक्तपणा जाऊन शरीरात शक्ती वाढते. तसेच शरीराची कडकी काढण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. विशेषत: रात्री शिळी भाकरी अधिक फायदेशीर असते.