Stamp Duty | मुद्रांक शुल्कातून अवघ्या सहा महिन्यांतच राज्याला तब्बल 17 हजार कोटींचा महसूल

पुणे : Stamp Duty |खरेदी-विक्री व्यवहारांमधून अवघ्या सहा महिन्यांत राज्य शासनाला (State Government) तब्बल १७ हजार ४१९ कोटी रुपयांचा महसूल (Revenue) जमा झाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने (Stamp Duty) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात या विभागाला 32 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी सहाच महिन्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.

राज्याला महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा (Stamp Duty) दुसरा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक या शहरांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. यामुळे दस्त नोंदणीतून सरकारला महसूल मिळतो.

करोना काळात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात मंदी आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने
(Maha Vikas Aghadi Government) मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत तीन टक्के आणि दोन टक्के अशी
सवलत दिली होती. तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी महिलेच्या नावे सदनिका घेतल्यास मुद्रांक शुल्कात
एक टक्का सवलत दिली होती. या दोन्ही निर्णयांचा फायदा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार वाढण्यात झाला होता. मात्र, यंदा या सवलती बंद करण्यात आल्या असूनही मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांत वाढ होताना दिसून येत आहे.

चालू आर्थिक वर्षातील दस्त संख्या आणि प्राप्त महसूल

महिना      दस्त संख़्या              महसूल (कोटींमध्ये)
एप्रिल      २,११,९१२                  १८०२
मे          २,२२,५७६                  २८०७
जून        २,४१,२८६                  ३४२३
जुलै        २,०५,७०९                  ३१००
ऑगस्ट     १,९७,५७७                 ३२९३
सप्टेंबर     २,३६,०८४                 ३०००
एकूण       १३,१५,१४४              १७,४१९

Web Title :- Stamp Duty | 17 thousand crores revenue to the state in just six months from stamp duty

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Latur ACB Trap | प्रधानमंत्री पीक विम्याच्या कामासाठी लाच घेणारे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दोन प्रतिनिधी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार