तेलगी घोटाळ्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला तेलगी घोटाळा म्हणजेच स्टॅम्प घोटाळ्याचा निकाल आज नाशिक जिल्हा न्यायालयामार्फत  सुनावन्यात आला आहे. बनावट मुद्रांकन घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असणारा अब्दुल करीम तेलगी याचा शिक्षा भोगत असतानाच ऑक्टोबर २०१७ मध्ये तुरुंगातच मृत्य झाला होता. आता या घोटाळ्यातील इतर आरोपी म्हणजेच रेल्वे पार्सल विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका झाली आहे. .
नेमके काय होते तेलगी प्रकरण ?
नाशिक येथील सिक्युरिटी प्रेसमधून कोट्यवधींचे स्टॅम्प रेल्वेच्या वॅगनमधून गायब करण्यात आले होते. हा ३२ हजार कोटींचा घोटाळा अब्दुल करीम तेलगीनं आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने केल्याचा त्यावर आरोप करण्यात आला होता. मात्र सीबीआय च्या तपासात पुराव्यांची कमतरता असल्याने त्याचा फायदा आरोपींना झाला आहे.

२००४ साली सीबीआयनं अब्दुल करीम तेलगी आणि त्यांच्या अन्य  सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र कोर्टात सादर केलं होतं. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये संशयितांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर.अनेक उच्च दर्जाची पदे असणाऱ्यांसह एकूण सात अधिकारी – कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.