पिंपळे निलख येथील उद्यानासाठी चार कोटीच्या खर्चास स्थायीत मंजूरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन 

पिंपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणाऱ्या सुमारे चार कोटी सहा लाख 82 हजार रुपयांच्या खर्चासह शहरातीलविविध विकास विषयक कामासाठी सुमारे 19 कोटी 69 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जलशुद्धीकरण केंद्र येथील लॅबोरेटरी करिता रासायनिक व अणु चाचण्या करण्याकरिता रसायनेपुरवण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी 5037 चौरसमीटरचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी सहा कोटी 17 लाख 53 हजार रूपये अधिमूल्य भरण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd3e787f-ac29-11e8-a6bd-510d8f861321′]

महापालिका परिसरातील ‘क’, ‘ड’, ‘इ’ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 46 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास, वाहन दुरुस्तीकार्यशाळा विभागामार्फत मनपाकडील विविध विभागाचे वापरात असलेली सर्व प्रकारची वाहने दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे एक कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चास,चिंचवड, मोहननगर भागातील चौकात व आवश्यक त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसविण्यासाठी येणा-या सुमारे 86 लाख 56 रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीतमान्यता देण्यात आली.

‘अ’ प्रभाग कार्यक्षेत्रातील निगडी प्राधिकरण उपविभागामधील आवश्यक चौकामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेकडील सीसीटीव्ही बसविणे व नियंत्रक पोलीस ठाणेकडेजोडण्यासाठी येणाऱ्या सुमारे 40 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाचे शिक्षण मंडळ कार्यालयाकडील प्राथमिक शाळांसाठी थ्री सिटर खुर्ची खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 43 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणाऱ्या सुमारे चार कोटी सहा लाख 82 हजार रुपयांच्या खर्चास, भोसरी कासारवाडी येथील आरक्षण क्रमांक 13 मध्ये विकसित करण्यासाठी येणाऱ्या सुमारे एक कोटी 64 लाख 64 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
जाहिरात