खळबळजनक ! पोलीस व्हॅनवर ‘डांगडिंग’ करत बनवला ‘Tik Tok’साठी व्हिडिओ, पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

राजकोट : वृत्तसंस्था – गुजरातमधील राजकोटमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने पीसीआर (पोलीस नियंत्रण कक्ष) व्हॅनवर उभारून Tik Tok व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी दुसऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने त्याला मदत केली. हा व्हिडिओ बनवणे दोघा पोलीस कॉन्स्टेबलला महागात पडले आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अमित प्रागजी आणि व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या नीलेश पूनाभाई या दोघांना आज (रविवार) निलंबित करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू पीसीआर व्हॅनवर उभारुन अमित प्रागजी याने व्हिडिओ तयार केला. गाडी चालू असताना दुसऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने त्याचा व्हिडिओ तयार केला. अधिकाऱ्याने सांगितले कि, कर्तव्यावर असताना पोलिसांची पीसीआर व्हॅनचा वापर करून व्हिडिओ बनवणे नियमाचे उल्लंघन केल्यासारखे आहे. त्यामुळे संबंधीत पोलीस कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

पोलीस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी केलेल्या तपासामध्ये अमित प्रागजी हा गाडी चालवत होता आणि नीलेश पूनाभाई काही अंतरावरून व्हिडिओ तयार करत होता. त्यामळे दोघांनाही निलंबित करण्यत आले आहे. हा व्हिडिओ दीड महिन्यापूर्वी रामनाथ पारा पोलीस लाईनच्या परिसरात चित्रीत करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like