‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा ‘इंग्लिश मीडियम’ गाण्याला ‘देशी’ तडका ! झपाट्यानं व्हायरल होतोय ‘व्हिडीओ’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. सपना तिच्या एका गाण्यामुळं पुन्हा चर्चेत आली आहे. तिचं एक गाणं पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे.

सपनाच्या या व्हायरल होणाऱ्या गाण्याचं नाव आहे इंग्लिश मीडियम. खास बात अशी की, हे गाणं रिलीज होऊन 3 वर्षे झाली आहे. तरीही हे गाणं धमाल करताना दिसत आहे. अद्याप या गाण्यानं 3 कोटींहून अधिक व्ह्युज मिळवले आहेत. या गाण्यात सपना ठुमके लगावताना दिसत आहे. तिला पाहण्यासाठी पूर्ण गाव जमा झाला आहे.

सपनाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर या गाण्यात सपनानं व्हाईट आणि रेड कलरचा ड्रेस घातला आहे. गाण्यात ती देसी स्टाईलमध्ये ठुमके लगावताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिनं आपल्या ठुमक्यांनी साऱ्यांना घायाळ केलं आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.