स्टार फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन झाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आयसोलेशनमध्ये ठेवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   स्टार फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन कोरोनाने संक्रमित आढळला आहे. मर्सिडीज टीमकडून जारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, त्याच्यात हलकी लक्षणे दिसून आली आहेत, मात्र तो पूर्णपणे फिट आहे आणि कोविड-19 प्रोटोकॉलनुसार विलगीकरणात राहील. दोन दिवसापूर्वीच बहरीन ग्रां प्री जिंकणारा हॅमिलटन आता या आठवड्यात होणार्‍या सखीर ग्रां प्री मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

ब्रिटनचा 35 वर्षीय ड्रायव्हर हॅमिल्टनने नुकताच 95वा विजय नोंदवला होता. यापूर्वी त्याने याच महिन्यात विक्रमी सातव्यांदा वर्ल्ड चॅम्पीयनशीपचा किताब जिंकला होता. याबाबतीत हॅमिल्टनने जर्मनीचा दिग्गज मायकल शूमाकर (7 किताब) च्या सर्वाधिक वर्ल्ड किताब जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्याने 2013 मध्ये मर्सीडीज टीममध्ये शूमाकरचे स्थान घेतले होते.