Starlink | डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू होईल Elon Musk यांच्या ‘स्टारलिंक’ची सेवा, मिळणार हाय-स्पीड इंटरनेट; जाणून घ्या ब्रॉडबँड सर्व्हिसबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Starlink | जगातील सर्वात श्रीमंत अरबपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या नेतृत्वाखालील सॅटेलाइट कंपनी स्टारलिंक (Starlink) पुढील वर्षी डिसेंबरपासून भारतात ब्रॉडबँड सर्व्हिस (broadband service) सुरू करू शकते. कंपनी इंटरनेट सर्व्हिस प्रदान करण्यासाठी देशातील 10 ग्रामीण लोकसभा मतदारसंघा (10 rural Lok Sabha constituencies) वर लक्ष केंद्रित करेल. कंपनी याबाबत ग्रामीण क्षेत्रातील बदलत्या जीवनात ब्रॉडबँड इंटरनेट (broadband internet) संपर्काच्या महत्वावर खासदार, मंत्री आणि प्रमुख सरकारी अधिकार्‍यांसोबत चर्चा सुद्धा करणार आहे.

2 लाख सक्रिय टर्मिनल
स्पेसएक्स (SpaceX) च्या सॅटेलाईट ब्रॉडबँड युनिटचे लक्ष्य सरकारच्या परवानगीने दोन लाख सक्रिय टर्मिनलसह डिसेंबर 2022 पासून भारतात ब्रॉडबँड सेवा (broadband services in India) सुरू करण्याचे आहे.

भारतात स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर (Starlink Country Director for India) संजय भार्गव (Sanjay Bhargava) यांनी रविवारी म्हटले की, मला ऑक्टोबरमध्ये खासदार, मंत्री, सचिवांसोबत 30 मिनिटांची व्हर्च्युअल चर्चा (30-minute virtual discussion with MPs, ministers, secretaries in October) करण्याची इच्छा आहे. भारतात पाठवलेल्या 80 फीसी स्टारलिंक टर्मिनल (Starlink terminal) साठी आम्ही संभाव्य दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करू.

 

ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक

यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया (social media) वर एका पोस्टमध्ये म्हटले होते की,
भारतातून ऑर्डरची संख्या 5,000 च्या पुढे गेली आहे आणि कंपनी ब्रॉडबँड सेवा प्रदान करण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक आहे. (Starlink)

7,350 रुपये प्रति ग्राहक शुल्क
कंपनी ग्राहकांकडून 99 डॉलर किंवा 7,350 रुपये प्रति ग्राहक शुल्क घेत आहे.
कंपनीने ग्राहकांना 50 मेगाबिट ते 150 मेगाबिट प्रति सेकंदची इंटरनेट गती प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title :- Starlink | elon musks starlink plans to start broadband service in india timeline booking price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Shalabhasana | ‘हे’ सोपे आसन पाठदुखीवर ‘रामबाण’, चरबी सुद्धा होते कमी; जाणून घ्या करण्याची पद्धत आणि 8 फायदे

Relationship With Partner | प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नात ‘पार्टनर’ तुमच्यावर कंट्रोल तर करत नाही ना? ‘या’ 6 संकेतावरून ओळखा; जाणून घ्या

Pune Crime | शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका ! पुणे पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन