Jio असो की Airtel, Vi आता येतोय हायस्पीड Starlink; जाणून घ्या सविस्तर…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील ‘स्टार’ व्यावसायिक एलॉन मस्क आता भारतात हायस्पीड इंटरनेट आणण्याच्या तयारीत आहेत. Starlink असे या इंटरनेट सेवेचे नाव आहे. त्यासाठी वेबसाईटही तयार केली आहे. या वेबसाईटवर तुम्ही Starlink साठी प्री-रजिस्ट्रेशनही करू शकता. त्यानुसार, आता कंपनी इंटरनेट प्लॅन देण्याच्या तयारीत आहे. ही सर्वात सुपरफास्ट इंटरनेट सेवा असेल, असे सांगितले जात आहे.

सॅटेलाईटच्या माध्यमातून लोकांना हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध केले जावे, असे एलॉन मस्क यांना वाटत आहे. त्यानुसार आता त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. सॅटेलाईट इंटरनेटची संकल्पना पूर्वीपासूनची आहे. हजारो सॅटेलाईटच्या माध्यमातून पृथ्वीवरील लोकांना इंटरनेट सेवा दिला जाऊ शकते. यामुळे तुम्हाला रिसिव्हर लावावा लागणार आहे. सॅटलाईटपर्यंत सिग्नल पाठवला जाणार आहे. हा रिसिव्हही केला जाईल. यामुळे मोठा फायदा होऊ शकेल. हायस्पीड इंटरनेट लेटेंसी कमी मिळेल. मल्टी गेमिंगमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जाणार आहे.

Starlink इंटरनेट घ्यायचं कसं ?
या इंटरनेट सेवेसाठी सॅटेलाईट डिश लावणे गरजेचे आहे. हा डिश घराच्या छतावर असेल. याशिवाय राऊटर घरात असेल. त्यानंतर तुम्ही हा कॉम्प्युटर किंवा कोणत्याही डिव्हाईसशी कनेक्ट करू शकता. जिथं इंटनेट नाही तिथं Starlink हायस्पीड इंटरनेट सेवा देऊ शकतो.

फ्री असेल की पैसे लागणार ?
एलॉन मस्क हे खाजगी कंपनी चालवून बिझनेस करत आहेत. त्यामुळे ते जाहीररित्या इंटरनेट विकून पैसे कमावू शकतात. सॅटेलाईट पाठवण्यासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे ते वसूल करण्याचा प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे ही इंटरनेट सेवा फ्री नसेल तर त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. भारतात त्यासाठी सुमारे 7000 रुपयांपासून प्री-ऑर्डर सुरु झाली आहे.

स्टारलिंकची जिओला टक्कर ?
फायबर ऑप्टिक्स आणि दुसऱ्या बाजूला सॅटेलाईट आहे. त्यामुळे फायबर ऑप्टिक्सचा स्पीड सॅटेलाईट इंटरनेट मॅच करू शकत नाही. सॅटेलाईट इंटरनेट कव्हरेज रेंज मोठी असते. म्हणजे संपूर्ण जगभरातून कुठूनही स्टारलिंकच्या माध्यमातून इंटरनेट मिळेल. जिओ किंवा कोणतीही टेलिकॉम कंपनी असे करू शकत नाही. कारण फायबर ऑप्टिक्सची आपली ठराविक मर्यादा असते. त्यामुळे स्टारलिंक दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांशी टक्कर देणार का, हे आत्ताच सांगता येऊ शकत नाही.