जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील करणार मदत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन बिझनेस  सुरू करण्याचा प्लान करत असाल तर एक न्यू बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्या बांबूच्या प्रॉडक्टला (bamboo product) बनवून चांगली कमाई करू शकता. सामान्यपणे पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर सर्वात जास्त केला जातो. परंतु प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोकादायक असल्याने केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर प्रतिबंध लावला आहे.

सरकारने प्लास्टिकच्या बाटल्यांना नवीन पर्याय काढला आहे. हा पर्याय म्हणून एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत खादी ग्रामोद्योग आयोगाने बांबूच्या बाटल्यांची (bamboo product) निर्मिती केली होती, जी प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरली जाते.

एका बाटलीची किंमत जाणून घ्या
या बांबूच्या बाटलीची क्षमता किमान 750 एमएल असेल आणि तिची किंमत 300 रुपयांपासून सुरू होईल. ही बाटली पर्यावरण अनुकूल असण्यासह टिकाऊ सुद्धा आहे. मागील दोन ऑक्टोबरपासून खादी स्टोअरमध्ये सुरू झाली आहे. तर केव्हीआयसी द्वारे अगोदरच प्लॅस्टिकच्या ग्लासच्या ऐवजी मातीच्या कुल्हडची निर्मिती सुरूकेली आहे.

हा बिझनेस सुरू करण्यासाठी कोणत्याही विशेष स्किल आणि मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
मात्र, जर हा बिझनेस मोठ्या स्केलवर सुरू केला गेला तर या बिझनेसचा सुरूवातीचा खर्च वाढू शकतो.
बांबूचे प्रॉडक्ट बनवण्याचा बिझनेस सुरूकरण्यासाठी तुम्हाला 1,70,000 रुपयांचे रॉ मटेरियल खरेदी करावे लागेल.
येथे क्लिक करून जाणून घ्या खर्चाबाबत…

https://www.kviconline.gov.in/pmegp/pmegpweb/docs/commonprojectprofile/BAMBOO%20ARTICLE%20MANUFACTURING%20UNIT.pdf

बांबूपासून आणखी काय बनवू शकता ?
बांबू बांधकामासाठी उपयोगी येत आहे.
तुम्ही याच्यापासून घर बनवू शकता.
फ्लोरिंग करू शकता. फर्नीचर बनवू शकता हँडीक्रॉफ्ट आणि ज्वेलरी बनवून कमाई करू शकता. बांबूपासून आता सायकल सुद्धा बनवण्यात येत आहेत.
कृषी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचा दावा आहे की, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टीट्यूट (सीबीआरआय), रुडकी ने यास बांधकामासाठी वापरण्यास मंजूरी दिली आहे.
आता शेडसाठी सिमेंटऐवजी बांबूच्या सीट सुद्धा तयार केल्या जाऊ शकतात.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ