नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ बिझनेस, दररोज होईल 4000 रुपयांपर्यंत कमाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्ही तुम्हाला एका अशा खास बिझनेसची पूर्ण माहिती देणार आहोत, जो सुरू करून तुम्ही रोज 4000 रुपये कमावू शकता. म्हणजे महिन्याला एक लाख रुपये. हा बिझनेस आहे केळ्याचे चिप्स बनवण्याचा. केळ्याचे चिप्स आरोग्यासाठी चांगले असतात. यासोबतच हे चिप्स उपवासाला सुद्धा खातात. केळ्याचे चिप्स बटाट्याच्या चिप्सपेक्षा जास्त प्रचलित आहेत, ज्यामुळे हे चिप्स जास्त प्रमाणात विकले जातात.

केळ्याच्या चिप्सच्या मार्केटची साइज छोटी आहे, ज्यामुळे मोठ्या ब्रँडेड कंपन्या चिप्स बनवत नाहीत. आणि याच कारणामुळे केळ्याचे चिप्स बनवण्याच्या बिझनेसला जास्त स्कोप आहे. हा बिझनेस कसा सुरू कराचा ते जाणून घेवूयात…

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी हवे हे साहित्य :
केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची मशीनरी वापरली जाते आणि कच्चा माल म्हणून प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि इतर मसाले यांचा वापर केला जातो. काही प्रमुख मशीनरी आणि उपकरणांची लीस्ट खालील प्रमाणे-

* केळी धुण्याचा टँक आणि केळी सोलण्याचे मशीन
* केळ्यांना पातळ तुकड्यांमध्ये कापण्याचे मशीन
* तुकडे फ्राय करण्याची मशीन
* मसाले इत्यादी मिसळण्याचे मशीन
* पाऊच प्रिंटिंग मशीन
* प्रयोगशाळा उपकरण

कुठून खरेदी कराल या मशीन्स :
केळ्याचा हा बिझनेस सुरूकरण्यासाठी तुम्ही या मशीन https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html वरून खरेदी करू शकता. या मशीन ठेवण्यासाठी तुम्हाला किमान 4000-5000 चौ. फु. जागेची आवश्यकता असेल. या मशीन तुम्हाला 28 हजारपासून 50 हजारपर्यंत मिळतील.

50 किलो चिप्स बनवण्याचा खर्च :
50 किलो चिप्स बनण्यासाठी किमान 120 किलो कच्ची केळी आवश्यक आहेत. 120 किलो कच्ची केळी सुमारे 1000 रुपयांना मिळतील. यासोबतच 12 ते 15 लीटर तेलाची आवश्यकता असेल. 15 लीटर तेल 70 रुपयांच्या हिशेबाने 1050 रुपये असेल. चिप्स फ्रायर मशीन 1 तासात 10 ते 11 लीटर डिझेल कंज्यूम करते. 1 लीटर डिझेल 80 रुपयांच्या हिशेबाने 11 लीटर होते, जे 900 रुपयांना पडेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपये. तर 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स बनवून तयार होतील. म्हणजे एक किलोचे चिप्सचे पॅकिट पॅकिंग कॉस्ट मिळून 70 रूपयाला पडेल. जे तुम्ही सहजपणे ऑनलाइन किंवा किराणा स्टोअरमध्ये 90-100 रुपयांना विकू शकता.

1 लाख रुपयांचे प्रॉफिट कमावू शकता
जर आपण 1 किलोवर 10 रुपयांचे प्रॉफिट जर धरले तरी तुम्ही दिवसाला 4000 रुपये सहज कमावू शकता. म्हणजे महिन्याल्या तुमच्या कंपनीने 25 दिवस जरी काम केले तरी तुम्हाला एका महिन्यात 1 लाख रुपये मिळतील.