फक्त महिलांसाठी कोंढवा येतून बससेवा सुरू ( हसीना इनामदार )

पुणे ( कोंढवा ) : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा परिसरातून फक्त महिलांसाठी कोंढवा ते पुणे स्टेशन बससेवा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते या महिलासाठी असलेल्या या विशेष बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून कोंढवा परिसर झपाट्याने वाढत आहे, या पार्श्वभूमीवर येथून महिलांसाठी विशेष बससेवा पीएमपीएलने सुरू करावी अशी मागणी होत होती. कोंढवा परिसरातून अनेक बहुसंख्य विद्यार्थिनी पुणे शहराच्या विविध भागात शिक्षणासाठी ये-जा करीत आहेत. तसेच नोकरदार महिला या भागांतून विविध ठिकाणी कामासाठी ये – जा करीत आहेत. त्याच्यासाठी या बससेवेचा निश्चित पणे लाभ होणार आहे, असे यावेळी राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या.

कोंढवा भागांतून पुणे स्टेशन पर्यंत खास महिलांसाठी बससेवा सुरू करण्यासाठी पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष हसीना इनामदार यांनी पाठपुरावा केला होता. याप्रसंगी त्या म्हणाल्या की कोंढवा भागांतून अनेक विद्यार्थिनी शहराच्या विविध शाळा कॉलेजात जातात. अनेक महिला काम धंद्यांनिमित्त विविध ठिकणी जात असतात. या महिलांना बसमधून जाताना गर्दीचा त्रास होत होता. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत होता, यामुळेच ही महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करणे गरजेचे झाले होते. कोंढवा ते पुणे स्टेशन पर्यंत ही बससेवा दिवसांतून सकाळी तीन व सायंकाळी तीन फेऱ्या करेल.

यावेळी नगरसेविका परविन हाजी फिरोज शेख, हमीदा अनिस सुंडके, नगरसेवक हाजी गफूर पठाण, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके, माजी नगरसेवक नारायण लोणकर, फारुख इनामदार, रईस सुंडके, स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, हाजी फिरोज शेख, पुणे शहर महिला उपाध्यक्ष हसीना इनामदार, दुगड स्कूलच्या प्राचार्य उषा ओक, अनवर आगवान, शकुर सय्यद, वाहक सविता राठोड-पवार, चालक विनोद मोहोळ व बहुसंख्य महिला यावेळीं उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल आगवान यांनी केले.