केंद्र सरकारच्या मदतीने ‘या’ प्रॉडक्टचा व्यवसाय करून दरमहा २ लाख हमखास उत्पन्‍न कमवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिस्पोजेबल म्हणजे कागदी, थर्माकोल कप, ताट, द्रोन (बाऊल) हे आणि यासारख्या इतर वस्तू वापरण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. जर तुम्ही देखील एखादा छोटा व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर हा व्यवसाय तुम्हाला कमी गुंतवणूकीत जास्त नफा मिळवून देईल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला २ ते ३ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला या वस्तू बनवण्यासाठी एक मशीन बनवावी लागेल.

छोटी मशीन घेऊन करा काम सुुरु –
आता अशा यूज अॅण्ड थ्रो या वस्तूंची मागणी शहरी भागासह गावाकडे देखील वाढत आहे. ग्रामीण भागात कागदी ताटांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यासाठी छोट्या मशीनच्या आधारे काम केले जाऊ शकते. कागदी कप – प्लेट ऑटोमॅटिक मशीनची बाजारातील किंमत २ ते ३ लाख रुपये आहे. मशीन बरोबर कच्चा माल तुम्हाला खरेदी करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमचे काम सुरु करु शकाल.

महिना ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कमाई –
वस्तू बनवल्यानंतर तुम्हाला बाजारात मार्केटिंग देखील चांगल्या प्रकारे करावी लागेल. जर तुम्ही थर्मोकॉलची ताटे बनवत असाल तर एक किलो कच्च्या मालातून तुम्ही ३०० प्लेट तयार करु शकतात. १ किलो थर्मोकॉलचे मटेरियल २०० ते २५० रुपये मिळते. तर तुम्ही या ताटांची विक्री तुम्ही २०० ते ३०० रुपयाला १०० प्लेट अशी करु शकतात.

याप्रकारे तुम्ही जर प्रतिदिन १ हजार प्लेट तयार करतात तर तुम्ही ६० ते ८० हजार रुपये महिना कमावू शकतात. तसेच माल बनवल्यानंतर उरलेले वेस्ट मटेरियल रिसायकलिंगसाठी तुम्ही परत करु शकतात आणि त्यातून देखील तुम्ही पैसे कमवू शकतात.

सरकार देखील करेल मदत –
सरकार पंतप्रधान एम्प्लाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देते. असा व्यवसाय सुरु करण्यासाठी ९० टक्के कर्ज देते. या योजनेत अशा व्यवसायासाठी २५ टक्के सबसिडी देखील देण्यात येते.

आरोग्यविषयक वृत्त –