मोदी सरकारच्या ‘या’ योजनेच्या मदतीने प्रतिमहिना ८०,००० कमावण्याची संधी ; सुरु करा ‘हा’ खास बिजनेस

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पैसा कमविण्यासाठी लोक नवनवीन प्रकारचे उद्योग करत आहेत. तुम्हाला आम्ही अशा बिजनेसविषयी सांगणार आहोत ज्या बिजनेसमधून तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला जॅम आणि जेली यांसारख्या फूड पुरवठा बिजनेसविषयी सांगणार आहोत. चला तुम्हाला आम्ही सांगतो की रेडी टू ईट प्रोडक्ट्स चे मार्केट वेगाने वाढत आहेत. ज्यामुळे जॅम स्कॉश यांचे देखील मार्केट वाढत आहे. अशामध्ये जर तुम्हाला बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्ही फ्रूट जैम, स्‍क्‍वॉश यांचा बिजनेस सुरु करू शकता. चला आपण समजून घेऊ या की अशा बिजनेसची सुरवात कशी करायची. अशाप्रकारचा बिजनेस सुरु करण्यासाठी सरकारकडून किती कर्ज मिळू शकते. केंद्र सरकार या बिजनेससाठी उदयोगी मित्र योजनेनुसार कर्ज देते.

तुम्हाला पाहिजे एवढ्या रुपयांची गुंतवणूक
उद्योगी मित्र योजनेनुसार सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रकल्पानुसार, फ्रुट जॅम, स्कॉश आणि कॉकटेल चे युनिट चालू करू इच्छितात तर तुमच्याजवळ ९.०८ लाख रुपये असायला पाहिजेत. पूर्ण प्रकल्पाची किंमत ३६.३० लाख रुपये होईल. यामध्ये १२ लाख रुपयाची प्लांट एन्ड मशिनरी, फर्निचरवर १. ५ लाख, अन्य असेटवर १.२ लाख आणि कामाचे भांडवलावर २१.६० लाख रुपयांचा समावेश आहे. यामध्ये २७.२३ लाख रुपयांचा बँकेतून लोन सेक्शन होईल.

या मशीनची लागेल गरज
जर तुम्ही हे युनिट लावू इच्छित आहात तर तुम्हाला अनेक प्रकरच्या मशीनची गरज लागेल. जस की पल्पियर, जूस एक्‍सट्रेक्‍टर, मिक्‍सर, ग्राइंडर, सलाइसर, कैप सीलिंग मशीन, बॉटल वाशिंग मशीन, कार्टून सीलिंग मशीन यांची गरज लागेल. या प्रकारच्या युनिटमधून तुम्ही जवळपास वर्षभरात ३० टन प्रोडक्शन करू शकतात.

एवढा होईल फायदा
या रिपोर्टनुसार, जर तुम्ही पहिल्या वर्षांत ६० % युटिलायजेशन करू शकत असाल तर तुमची ऐकून विक्री ६४.८० लाख रुपये होईल. या६४ ६मध्ये कच्चा माल आणि इतर खर्च ४४. ६४ लाख इतका असेल. १४.१३ लाखाचा फायदा होईल.

अधिक माहितीसाठी
जर तुम्ही बिजनेसविषयी संशयात असाल तर तुम्ही http://www.udyamimitra.in या वेबसाईटचा आधार घेऊ शकता. तुम्हाला लोन घेण्यासाठी अप्लिकेशन फायलिंग, प्रोजेक्त रिपोर्ट तयार करणे, फायनान्शिअल ट्रैनिंग, स्किल डेव्हलपमेंट या पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला मशीन कोठून खरेदी करायची याची सर्व महिती वेबसाईटवर दिली जाईल.