फायद्याची गोष्ट ! केवळ 500 रूपयांपासून गुंतवणुकीला करा सुरू अन् 1 कोटींहून अधिकचा ‘रिटर्न’ मिळवा, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – घर, गाडी, विवाह, मुलांचे शिक्षण त्यांचे विवाह किंवा निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी काही करायचे ठरवले असेल तर त्यासाठी गुंतवणूक(Investments) करावी लागेल. ही गुंतवणूक(Investments) करण्यासाठी काही मोठी रक्कम असावीच लागते असे काही नाही. जर आपण दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवले तर मोठी रक्कम मिळते. सध्याच्या परिस्थितीमध्ये बचतीला खूप मोठे महत्त्व आहे. पण काही जण याकडे गांभीर्याने पाहत नाही. तर काही जण एवढा काळ गेल्यानंतर आम्ही गुंतवणूक करतो असे म्हणतात पण ती वेळ कधीच येत नाही, आता गुंतवणूक(Investments) करायची म्हंटल तर ती कोठे करायची, चांगले रिटर्न कशात मिळणार यांसारखे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहेत. वित्त सल्लागार आजच्या काळात चांगले रिटर्न मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. यामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपी असून कोणीही म्हणजे कोणत्याही वयाचे लोक म्युच्युअल फंडात एसआयपी करू शकतात. कमी वयात गुंतवणूक केल्यास आरामात लक्ष्य गाठले जाऊ शकते.
पुण्यात साधे पेट्रोलही शंभरी ‘पार’ !
बँकेतील घटत्या व्याजदरामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. यामधील एसआयपी तीन पद्धतीने सुरू करता येईल. पहिला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड एजंटांच्या माध्यमातून, दुसरा पर्याय ब्रोकरकडून ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट उघडून, तिसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडाच्या डायरेक्ट फंडामध्ये गुंतवणूक करावी. त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जाऊन गुंतवणूक करता येऊ शकते. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. या माध्यमातून गुंतवणूक केल्यावर चांगला रिटर्न मिळणे सोपे होते. एसआयपीच्या माध्यमातून कुठल्याही डायवर्सिफाइड म्यच्युअल फ्ंडामध्ये गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडामध्ये ५०० रुपये दरमहा एवढ्या रकमेपासून गुंतवणुकीची सुरुवात करता येऊ शकते. म्हणजेच म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते.
व्हॅक्सीन घेतलेले लोक सुद्धा पसरवू शकतात का कोरोना, जाणून घ्या रिसर्चमध्ये काय आले समोर
तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर तुम्हाला गुंतवणूक दर महिन्याला सुरू ठेवावी लागेल. उदाहरण द्यायचं झाल्यास जर कुठल्याही २५ वर्षांच्या तरुणाने ५०० रुपयांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला सुरुवात केली. तर त्याने दर सहा महिन्यांनी किमान ५०० रुपयांची गुंतवणूक वाढवली पाहिजे. त्यामुळे पाच वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढून ५ हजार रुपये होईल. हे शक्य आहे. कारण नोकरदार व्यक्तींचा पगार दरवर्षी वाढतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या दोन वर्षांतील रिटर्न पाहाल तेव्हा गुंतवणुकीबाबतचा तुमचा उत्साह वाढेल.
उदाहरण द्यायचं झाल्यास जर कुणी ३० वर्षांच्या वयात म्युच्युअल फंडामध्ये पुढील ३० वर्षांपर्यंत दर महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला ६० वर्षांच्या वयात १ कोटी ७६ लाख ४९ हजार ५६९ रुपयांचा घसघशीत परतावा मिळेल. हा अंदाज ५ हजार रुपये दरमहा गुंतवणुकीवर १२ टक्के व्याजाच्या हिशेबाने बांधण्यात आले आहे. जर त्यावर १५ टक्के व्याज मिळाले तर पुन्हा एकूण रिटर्न ३ कोटी ५० लाख ४९ हजार १०३ रुपये एवढा होईल. तर व्याज १० टक्के जरी मिळाले तरी ५ हजारांच्या गुंतवणुकीवर ३० वर्षांनंतर एकूण १ कोटी १३ लाख ९६ हजार ६२७ रुपयांचा रिटर्न मिळेल.
दुसरीकडे लहान गुंतवणूकदारांसाठी सर्वात कठीण काम असते ते गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड करणे. कारण फंडाची निवड करण्यासाठी याचा बारकाईने अभ्यास करणे खूप गरजेचे असते. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही बाजार गुंतवणुकीमधील जोखमीवर आधारित असल्याने सर्व पैलूंचा अभ्यास करून, त्याचबरोबर माहितगाराकडून सल्ला घेत म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
World No Tobacco Day : कॅन्सरच नव्हे, तंबाखू खाण्याने होतात इतरही जीवघेणे आजार
शेअर बाजारामधील गुंतवणुकीबाबत फार माहिती नसते अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. कारण गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड कंपन्या पैसे गोळा करून त्यामधील मोठी रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवतात. त्याबदल्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून चार्ज घेतात. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य असते.