मोदी सरकारच्या निर्णयामुळं ‘हा’ व्यवसाय झालाय ‘हिट’, तुम्ही देखील कमवू शकता दरमहा 50 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने सिंगल युज प्लॅस्टिकवर कायमची बंदी आणली आहे. प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या उत्पादनांच्या वापरावर सरकारने बंदी आणली असून यामुळे गोल्ड फायबर म्हणजेच ज्यूटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ज्यूटच्या बॅगांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर न करण्याची सरकारला विनंती करावी लागत आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे कमी भांडवलात जास्त नफा कमवण्याची मोठी संधी आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला कॉर्पोरेशनच्या गिरण्यांना 20 लाख पिशव्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज पडली आहे. उपाध्यक्ष आदित्य शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी हे युनिट सुरु करण्यात आले असून महिन्याला दीड लाख बॅग बनवण्याची या युनिटची क्षमता आहे. लवकरच आम्ही नवीन ठिकाणी याच क्षमेतचे आणखी एक प्लांट सुरु करणार असून याद्वारे आम्ही मागणी पूर्ण करणार आहोत. केवळ विदेशातच नव्हे तर देशभरात देखील या बॅगांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एका युनिटला लागेल इतकी रक्कम –

या बॅग बनवण्यासाठी लागणाऱ्या युनिटच्या उभारणीसाठी तुम्हाला सुरुवातीला 5 शिलाई मशीन घ्याव्या लागणार आहेत. यासाठी तुम्हाला जवळपास 90 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 लाख 4 हजार रुपये खेळते भांडवल देखील लागणार आहे. तसेच इतर खर्चासाठी 58 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे एकूण खर्च हा 2.52 लाख रुपये येणार आहे. यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून कर्ज देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 65 टक्के कर्ज हे केंद्र सरकारच्या वतीने मिळत असून 25 टक्के कर्ज हे नॅशनल सेंटर फॉर जूट डायवर्फिकेशनकडून मिळणार आहेत तर 10 टक्के भांडवल हे तुम्हाला स्वतः घालावे लागणार आहे.

इतके होईल उत्पादन –

यामध्ये तुम्ही 9 हजार शॉपिंग बॅग, 6 हजार लेडीज बॅग, 7500 स्‍कूल बॅग, हजार जेंट्स हॅन्ड बॅग तर 6 हजार जूट बांबू फोल्‍डरचे तुम्ही वर्षाला उत्पादन करू शकता.

इतकी होईल कमाई –

जर तुम्ही वर्षाला इतके उत्पादन घेतले तर तुम्हाला 27.95 लाख रुपये खर्च येणार असून यामधून तुम्ही 32.25 लाख रुपये नफा मिळवणार आहात. यामुळे तुम्ही वर्षाला 4.30 लाख रुपये कमावणार असून महिन्याला 36 हजार रुपये तुम्ही कमावणार आहात.

Visit : Policenama.com