2 ऑक्टोबर पासुन ‘या’ उत्पादनाची डिमांड वाढणार, सुरू करा व्यवसाय अन् कमवा महिना 50 हजार रूपये महिने, जाणून घ्या

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात आवाहन केले की 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवसापासून सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग टाळावा. पंतप्रधान मोदीच्या आवाहनाला साद देऊन प्लास्टिकच्या कप, ग्लासवर रोख लावण्यात आली तर दुसरीकडे नव्या व्यवसायाच्या संधी उभ्या राहिल्या. जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय तुम्ही सरकारच्या मदतीने करु शकतात.

सिंगल यूज प्लास्टिक बंद झाल्यानंतर बाजारात आले ती कागदी चहाचे कप आणि लस्सी, कोल्ड्रिंग पिण्यासाठी कागदी स्ट्रॉ. त्यामुळे तुम्ही कागदी कप निर्मितीचा व्यवसाय सुरु करु शकतात. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंतची कमाई करु शकतात.

किती करावी लागेल गुंतवणूक –
जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्वरुपात करु इच्छित असाल तर तुम्हाला यासाठी 1 ते 1.50 लाख रुपये एवढी गुंतवणूक लागेल. यातून तुम्ही 90 पासून 200 एमएलचे ग्लास, कप तयार करु शकतात. यासाठी तुम्हाला काही मशिन खरेदी कराव्या लागतील. 1 ते 2 लाखात तुम्हाला एकाच साइजचे कप, ग्लास तयार करणारी मशीन मिळेल. जर तुम्ही कोणत्याही साइजचे कप आणि ग्लास तयार करु इच्छित असाल तर तुम्हाला 10 – 12 लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

पेपर कप फ्रेमिंग मशीन 5 लाख रुपयांपर्यंत मिळेल. ऑफिस इक्विपमेंटसाठी 50 हजार रुपये खर्च होईल. रॉ मटेरिअल कपसाठी तुमच्याकडे पेपर रिळ असणे आवश्यक आहे. याबरोबर तुमच्याकडे बॉटम रिळ असणे आवश्यक आहे जे 8 रुपये किलोग्रॅमने खरीदी करता येतात.

कुठे मिळेल मशीन –
या मशीन तुम्हाला दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबाद यासह अनेक शहरात मिळतील. या प्रकारचे काम इंजिनिअरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या करतात. याशिवाय इंडिया मार्टच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही या मशीन तयार करणाऱ्या निर्मात्यांशी संपर्क साधून मशीन मागवू शकतात. येथून तुम्ही कागदी कप तयार करण्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलची खरेदी करु शकतात.

कशी होईल कमाई –
मशीनचा वापर करुन तुम्ही एका मिनिटाला 50 कप तयार करु शकतात. तर महिन्याला 15,60,000 कप तयार करु शकतात. जर तुम्ही हा कप 30 पैसे प्रति कप या दराने जरी विकला तरी तुम्ही जवळपास 4,68,000 रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात. जर यातून 4,08,984 रुपये वस्तू तयार करण्यासाठी लागणारा खर्च म्हणून जरी धरला तरी 59,036 – 60,000 रुपयांपर्यंत रक्कम कमाऊ शकतात.

कसे करावे रजिस्ट्रेशन –
स्मॉल स्केलवर व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही घरीच छोटी मशीन लावून उत्पादन सुरु करु शकतात. जर तुम्ही मोठ्या पातळीवर व्यवसाय उभारु इच्छित असाल तर MSME अंतर्गत नोंदणी आणि उद्योग आधार नोंदणी करु शकतात.तसेच ट्रेड लायसेंस, फर्म चे चालू खाते, पॅन कार्ड इत्यादीची गरज भासेल. यासाठी तुम्ही मुद्रा लोन देखील मिळवू शकतात.

Visit : Policenama.com