रेल्वेसोबत मिळून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा कमवा लाखो रुपये…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपणदेखील व्यवसाय करण्याची योजना आखत असाल, तर आपण भारतीय रेल्वेसोबत मिळून पैसे कमवू शकता. आपण कमी भांडवलातदेखील बम्पर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. स्वावलंबी भारत (आत्मनिर्भर भारत) मोहिमेअंतर्गत भारतीय रेल्वेने मायक्रो, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) आपला भागीदार होण्याची संधी दिली आहे, तर तुम्हालाही जोडीदार व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. यात आपण रेल्वेशी संपर्क साधून चांगली कमाई करू शकता.

रेल्वेला उत्पादने विकून मिळवा पैसे

रेल्वे दरवर्षी वार्षिक 70,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची उत्पादने खरेदी करते. यात अनेक प्रकारचे तांत्रिक आणि अभियांत्रिकी उत्पादने तसेच दररोज वापरात येणार्‍या उत्पादनांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आपण लहान व्यापारी बनून आपली उत्पादने रेल्वेला विकू शकता.

आपण येथे व्यवसायासाठी नोंदणी करू शकता

आपणास रेल्वेसह व्यवसाय करायचा असल्यास आपण https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वर नोंदणी करू शकता.

हा व्यवसाय कसा सुरू करावा?

– रेल्वे स्वस्त वस्तू पुरवणाऱ्या कंपनीकडून खरेदी करते. अशा परिस्थितीत, आपण कंपनीकडून स्वस्त उत्पादन खरेदी करून ते रेल्वेला विकू शकता.

– यानंतर डिजिटल सिग्नेचर बनवा. त्याच्या मदतीने आपण https://ireps.gov.in आणि रेल्वेच्या https://gem.gov.in वेबसाइटवर जाऊन नवीन टेंडर पाहू शकता.

– टेंडर ठेवताना तुमची किंमत आणि नफा याची काळजी घ्या. त्याच आधारे टेंडर टाका.

– हेदेखील लक्षात ठेवा की जर आपले दर स्पर्धात्मक असतील, तर टेंडर मिळवणे आपल्यासाठी सोपे होईल. सेवेच्या पुरवठ्यासाठी रेल्वेने काही तांत्रिक पात्रतेची मागणी केली आहे.

याशिवाय एमएसएमईला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे एक मोठा निर्णय घेत आहे. कोणत्याही रेल्वे टेंडर खर्चाच्या 25 टक्के खर्चाच्या खरेदीत एमएसएमईंना 15 टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. याशिवाय छोट्या उद्योगांना सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधूनही सूट देण्यात आली आहे.

पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

आपण आधीपासून नोंदणी केली असेल किंवा आपण रेल्वेच्या दुसर्‍या एजन्सीमध्ये उत्पादन पुरवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आपल्याला नवीन नोंदणीची आवश्यकता नाही. एकदा नोंदणी झाल्यावर आपण रेल्वेने व्यवसाय सुरू करू शकता.