राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत रक्कम देण्यास सुरवात : आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत रक्कम भरण्यास साखर कारखानदारांनी सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांत सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपये कारखान्यांनी भरले अशी माहिती. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच एफआरपी ची थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी आंदोलन केले होते. साखर आयुक्त गायकवाड यांना निवेदन दिले होते. यानंतर आयुक्त गायकवाड यांनी ३९ कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली होती. १३५ कारखान्यांना नोटीस पाठविली होती. याविषयी गायकवाड म्हणाले,” गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात एफआरपी ची थकीत रक्कम जमा झाली आहे. जप्तीची नोटीस बजावले ल्या कारखान्यांनी 80टक्के रक्कम जमा केली आहे. इतर कारखान्यांची सुनावणी सुरू आहे.

गाळप सुरू असताना प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एफआरपी ची रक्कम जमा होत आहे. ११ कारखन्यांनी १०० टक्के रक्कम जमा केली आहे. ६४ कारखन्यांनी ७० टक्कयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. यावर्षी साडे तेराशे कोटी रुपये इतकी एफआरपी ची रक्कम होत असून ४ हजार ८०० कोटी हीं उर्वरीत रक्कम या महिन्यात वसुल केली जाईल.