फायद्याची गोष्ट ! 10 हजारमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, मंदीचा सुद्धा होणार नाही परिणाम ! दरमहा होईल 1 लाखाची कमाई, सरकार देईल 25% सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही डेअरी फार्मिंगचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमी पैशात सुरू करू शकता. काही दिवसानंतरच तुम्हाला यातून मोठी कमाई होऊ लागेल. सध्या डेअरी फार्मिंग सर्वात चांगले सेक्टर आहे, जिथे प्रगतीच्या अनेक शक्यता आहेत.

हे एक असे सेक्टर आहे ज्यामध्ये कधी मंदीचा काळ दिसत नाही. वर्षभर यामध्ये कमाई होते. एक मोठा लाभ हा सुद्धा आहे की, याची सुरुवात करण्यासाठी खर्चसुद्धा जास्त येत नाही. सोबतच केंद्र आणि राज्याकडून पशुपालनासाठी कर्ज आणि सबसिडी दिली जाते. अशावेळी डेअरी उघडून तुम्ही रोज चांगली कमाई करू शकता. याबाबत सर्व काही जाणून घेवूयात…

असा सुरू करा बिझनेस
सुरुवातीच्या टप्प्यात कमी गायी किंवा म्हशींची निवड करा. मागणीच्या आधारावर गुरांची संख्या वाढवता येईल. यासाठी सर्वप्रथम चांगल्या जातीच्या गायी किंवा म्हशी खरेदी करा आणि त्यांची चांगली देखभाल करा. यामुळे जास्त प्रमाणात दुध मिळेल. उत्पन्न वाढेल. काही दिवसानंतर जनावरांची संख्या वाढवू शकता.

2 जनावरांपासून सुरू करू शकता डेअरी
छोट्या प्रमाणात काम सुरू करायचे असेल तर 2 गायी किंवा म्हैशी घेऊन डेअरी सुरू करू शकता. दोन जनावरांसाठी तुम्हाला 35 ते 50 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते.

सरकार करते मदत
डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे. यामध्ये बँकेकडून कर्ज पुरवले जाते. कर्जावर सबसिडी मिळते. 10 जनावरांची डेअरी सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे. कृषी मंत्रालयाच्या डीईडीएस योजनेत जवळपास 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळते. ही सबसिडी नाबार्डकडून दिली जाते. यासाठी जिल्ह्याचा पशुपालन विभाग मदत करू शकतो.