सरकारच्या मदतीनं 2 लाख रूपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा मोठी कमाई करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्यवसाय सुरु करायचा झाल्यास सर्वात पहिला प्रश्न असतो तो त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याचा, पैशांचा. अनेकदा चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरु होतो परंतू काही दिवसांनी पैशांच्या गैरसोयीमुळे ठप्प पडतो. परंतू कमी गुंतवणूकीत व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही 2 लाखात व्यवसाय सुरु करु शकतात.

तुम्ही पापड तयार करण्याचा व्यवसाय 2 लाखाच्या गुंतवणूकीत सुरु करु शकतात. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC) ने यासंबंधित एक रिपोर्ट तयार केला आहे, ज्या माध्यामातून तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गंत 4 लाख रुपयांपर्यंतचे स्वस्त दर असलेले कर्ज घेऊ शकतात.

या रिपोर्टनुसार 6 लाख रुपयांच्या गुंतवणूकीमध्ये 30 हजार किलोचे उत्पादन तयार होईल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हीला 6.05 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. भांडवलात 2 मशीन, एक पॅकेजिंग मशीन एक इक्विपमेंट मशीन, याचा खर्च सहभागी असेल.

वर्किंग कॅपिटल
यात स्टाफला 3 महिनांचा पगार, तीन महिन्याचा कच्चा माल आणि यूटिलिटी प्रोडक्टचा खर्च सहभागी असेल. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन यांच्या बिलाचा समावेश असेल. पापडाच्या व्यवसायासाठी 250 स्वेअर मीटरचा एरिया लागेल.

व्यवसाय सुरु करण्यासाठी महत्वाच्या बाबी
यासाठी तुमच्याकडे एक जागा आवश्यक आहे. तुम्ही ही जागा भाडे कराराने घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला किमान 5 हजार रुपयांपर्यंतचे भाडे लागेल.

मॅन पॉवर 
3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार, 1 सुपरवायजर. त्या सर्वांना द्याला लागणारा एकूण पगार 25,000 रुपयांपर्यंत. जे वर्किंग कॅपिटलमध्ये अ‍ॅड होईल.

Visit : policenama.com