युवकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारचं तरूण शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट, व्यवसायासाठी देणार 3.75 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं जिणं जगत आहेत. अशात ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांसाठी मोदी सरकारनं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme) तयार केली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तरुण शेतकरी ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण प्रयोगशाळेची (Soil Test Laboratory) स्थापना करू शकणार आहेत. यासाठी त्या तरुणाचं वय १८ ते ४० च्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. या प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी एकूण ५ लाख रुपये खर्च येतो. ज्यातील ७५ टक्के खर्च म्हणजेच ३.७५ लाख रुपये मोदी सरकारकडून देण्यात येणार आहेत.

मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजे काय?

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता गट, कृष्णा सहकारी समिती, कृषक उत्पादक संघटना किंवा कृषक गटाने या प्रयोगशाळेची स्थापना केल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेद्वारे सरकारकडून मातीचा नमुना घेणे, त्याचे परीक्षण करणे आणि सॉइल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ३०० प्रतिनमुना प्रदान करण्यात येणार आहे. लॅब बनवण्यासाठी सामान्य तरुण किंवा इतर कृषी क्षेत्रातील संघटनांचे उप-संचालक, कृषी क्षेत्रातील संयुक्त संचालक किंवा त्यांच्या कार्यालयाला प्रस्ताव देता येणार आहे.

अशा पद्धतीनं करा सुरुवात

या प्रयोगशाळेची दोन पद्धतीने सुरुवात केली जाऊ शकते. यापैकी पहिली पद्धत म्हणजे एखादं दुकान भाड्याने घेऊन त्यात प्रयोगशाळेची सुरुवात करता येऊ शकते तर दुसरी पद्धतीत प्रयोगशाळा ही फिरत्या पद्धतीची असते. या पद्धतीत प्रयोगशाळा फिरत्या स्वरूपाची असल्याने ती कुठेही घेऊन जाता येणार आहे, या प्रयोगशाळेस MOBILE SOIL TESTING VAN असे म्हटले जाते.

– यामध्ये पहिल्यांदा अशा मातीचा नमुना तपासणार जाणार आहे की, जो प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असेल किंवा कुणी मातीचा नमुना घेऊन आला असेल. या नंतर त्या मातीच्या नमुन्याचा अहवाल ईमेलद्वारे किंवा प्रिंटाऊटच्या माध्यमातून त्या नमुना घेऊन येणाऱ्या ग्राहकाला पाठवला जाणार आहे.

– प्रयोगशाळेतील सशर्त नियमावलीनुसार मातीचा नमुना तपासला जाणार असून हा उद्योग छोट्या स्तरावर सुरू केला जाऊ शकतो. जेव्हा एखाद्याला या व्यवसायाची संपूर्ण माहिती होईल किंवा आत्मविश्वास येईल, तेव्हा तो या व्यवसायाचा विस्तार देखील करू शकतो.

– कृषीशिवाय व्यावसायिक अन्न प्रक्रिया (Food Processing) उद्योग देखील सुरू करता येऊ शकतो. ज्या कंपन्या बियाणे, खत, जैवइंधन, कृषी यंत्रणा इ. तयार करतात अशा कंपन्यांनाही व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो.