फायद्याची गोष्ट ! फक्त 50 हजार गुंतवून दरमहा कमावू शकता 30 ते 40 हजार रुपये, सुरू करा हा बिझनेस, जाणून घ्या

नवी दिल्ली : आज आम्ही तुम्हाला एका अशा बिझनेसबाबत (Business) सांगणार आहोत, ज्याची मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड आहे. हा बिझनेस (Business) स्मॉल स्केलमध्ये टी शर्ट प्रिंटिंगचा आहे. प्रिंटेड टी शर्टची सध्या बाजारात मोठी मागणी आहे. बर्थडे असो की, अन्य एखादा खास क्षण, आजकाल लोक आपल्या मित्रांना आणि खास लोकांना गिफ्ट देणे पसंत करतात. याशिवाय शाळा, कंपन्या आणि बिझनेस (Business) ऑर्गनायझेशनमध्ये अनेक निमित्ताने कस्टमाइज्ड टी शर्ट प्रिंट केले जातात. एकुणच या बिझनेसमध्ये(Business) खुप संधी आहे. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

50-70 हजार रुपयात सुरू करा बिझनेस
हा बिझनेस खुप कमी भांडवलात घरातच सुरू करता येऊ शकतो. आपण केवळ 50 हजार रुपये ते 70 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून टी शर्ट प्रिंटिंग बिझनेसची सुरुवात करू शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही 30 ते 40 हजार रुपये महिना कमावू शकता. याशिवाय यामध्ये यशस्वी झालात तर गुंतवणूक वाढवून आपल्या बिझनेसच्या कक्षा वाढवू शकता. यानंतर तुमचे उत्पन्नसुद्धा लाखो रूपये महिना ते कोरोडे वर्षाला होऊ शकते.

जाणकारांनुसार कपड्याची एक सामन्य प्रिंटिंग मशीन 50 हजार रुपयात येते आणि तिच्याद्वारे काम सुरू करता येऊ शकते. प्रिंटिंगसाठी घेण्यात येणार्‍या एका सामान्य क्वालिटीच्या एका व्हाइट टी शर्टची किंमत सुमारे 120 रुपये आहे. आणि याची प्रिटिंग कॉस्ट 1 ते 10 रुपयांच्या दरम्यान येते, आपण तो किमान 250 रुपये ते 300 रुपयांपर्यंत विकू शकता.

अशाप्रकारे दलालांची भूमिका कमी केली गेली तर एका टी शर्टवर किमान 50 टक्केचा फायदा मिळू शकतो. विशेष गोष्ट ही आहे की, विक्री सुद्धा स्वता करू शकता.

ऑनलाइन विक्री करणे सोपे
आजकल सोशल मीडियावर लोकांची चांगली उपस्थिती असते. आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी हा चांगला पर्याय आहे. हे मध्यम खर्चाचे माध्यम आहे. तुम्हाला एक ब्रँड बनवून किंवा एखाद्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे हे विकावे लागेल.

ऑटोमॅटिक मशीनने प्रॉडक्शन दुप्पट
हळुहळु तुम्ही आपल्या बिझनेसची कक्षा वाढवू शकता. बिझनेसच्या या वाढीदरम्यान तुम्ही महाग मशीनचा सुद्धा वापर करू शकता, जी उत्तम क्वालिटी आणि जास्त प्रमाणात टी शर्ट प्रिंटिंग करू शकते. सर्वात स्वस्त मशीन मॅन्युअल असते. यामध्ये एक टी शर्ट जवळपास 1 मिनिटात तयार होते.