नागापूर, बोल्हेगाव उपनगरांत शहर बससेवा सुरु करा ; अन्यथा आंदोलन

अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा आयुक्तांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बोल्हेगांव, नागापुर प्र.क्र.७ या भागामध्ये परिचय हॉटेल ते बोल्हेगाव जि.प. शाळा ते केशव कॉर्नर,राघवेंद्र स्वामी मंदीर, गणेश चौक, आंबेडकर चौक, चैतन्य क्लासिक मार्ग या मार्गे शहर बससेवा तात्काळ सुरू करा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसमवेत मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट केली आहे. मागणीचे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, डॉ सागर बोरुडे, प्रा. माणिक विधाते, दादा दरेकर, साधनाताई बोरुडे, गजेंद्र भांडवलकर, सुरेश बनसोडे,अशोक पालवे, नवनाथ कोलते, महादेव कोकाटे, समाधान मोरे, आदिनाथ म्हस्के, अशोक गर्जे, कैलास पवार, महेश धोगरे, किसन आडागळे, पंकज लोखंडे, निवृत्ती हंडे, भाऊसाहेब देशमुख, तुषार सोनवणे, राजू वाकळे, अरुण ससे, संपत वाकळे, शरद महापुरे, गणेश खंडागळे, सचिन कदम, तुषार बेग, भाऊसाहेब इथापे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोल्हेगाव नागापूर प्र.क्र.७ या भागातील खूप मोठया प्रमाणात विद्यार्थी नगर शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच या भागामध्ये गोरगरीब लोकवसाहत अत्यंत जास्त प्रमाणात आहे. नगरमध्ये काम करण्यासाठी जाणारा कर्मचारी वर्ग ही खुप मोठा आहे.तसेच येथील राहती लोकसंख्या साधारतः १५००० पेक्षा जास्त आहे.त्यामुळे रोज सकाळी ९ व १०या वेळेत व संध्याकाळी ५.३० व ६.३० यावेळेमध्ये बस सुरू करावी जेणेकरून येथील विद्यार्थ्यांचे व नागरीकांचे नगरला जाण्या – येण्यासाठी हाल होणार नाही. यापूर्वी आपणाला दि.१ जुलै रोजी निवेदन दिले होते. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही. तरी बोल्हेगाव नागापुर प्र.क्र.७ या भागामध्ये परिचय हॉटेल ते बोल्हेगांव जि.प. शाळा ते केशव कॉर्नर,राघवेंद्र स्वामी मंदीर,गणेश चौक,आंबेडकर चौक,चैतन्य क्लासिक मार्ग अ.नगर या मार्गे शहर बस सेवा तात्काळ सुरू करावी. अन्यथा बोल्हेगांव, नागपुर परिसरातील नागरीकांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक