व्यवसाय करण्यासाठी ‘हे’ आहेत 10 मार्ग; घरबसल्या होणार 50 हजार ते 1 लाख रुपयाची कमाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : घरबसल्या लोक पैसा कमावण्यासाठी एक कोणतातरी मार्ग शोधत असतात. मात्र त्यांना कधी एकाही गोष्टीचा ठावठिकाणा लागत नाही. मात्र आता घरबसल्या लोकांसमोर पैसे कमवण्यासाठी १० व्यवसाय करण्याचे मार्ग समोर आले आहेत. यामध्ये व्यक्तीला प्रति महिना लाखो रुपयाची मिळकत असणार आहे. तर प्रारंभी ती व्यक्ती व्यवसाय सुरु करण्यासाठी पन्नास हजार अथवा एक लाख रुपयांचे भांडवल गुंतवणूक करू शकणार आहे. तर हा व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यक्तीला कुठल्याही अनुभवाची गरज लागत नाही. कोणते व्यवसाय असणार ते जाणून घ्या.

– मशरूमची शेती
घराजवळील बागेतच मशरूमची लागवड सुरू करण्याचा देखील पर्याय आहे. तर कमी गुंतवणूक आणि कमी मेहनतीने व्यक्ती ५० हजारांपर्यंत कमाई करू शकते.

– वृक्ष लागवड
कोणत्या व्यक्तीकडे जमीन असल्यास तेव्हा शिशम, सागवान अशी मौल्यवान झाडे लावू शकता. तसेच, ही झाडे ८ ते १० वर्षानंतर आपल्याला चांगली कमाई करतां येणार आहे. सध्या एक शिशमचे झाड ४० हजारांपर्यंत विकले जात आहे. तसेच, सागवानचे झाड त्याहीपेक्षा जास्तच महाग आहेत.

– बांबूचा लागवड
बांबूचा व्यवसाय देखील व्यक्ती करू शकते. बांबू लागवडीद्वारे देखील चांगली कमाई होणार आहे. सध्या लोकांना बांबूची उत्पादने खूप आवडतात. याव्यतिरिक्त ऑनलाइन साइट तयार करुन व्यक्ती त्याचे उत्पादन चांगल्या किमतीमध्ये देखील विकू शकणार आहे.

– मासेमारीचा व्यवसाय
मासेमारीचा व्यवसाय सुरू करण्यास सुद्धा हा एक मार्ग आहे. यामधून व्यक्ती लाखोंची कमाई करू शकणार आहे.

– कोरफडची शेती
कोरफडची शेती याचा सुद्धा एक व्यवसायच आहे. कोरफडांची झाडे लावून तुम्ही शेती करू शकणार आहात. फक्त १० हजार रुपये खर्च करून जवळपास २५०० रोपे लावू शकता. तसेच, ही झाडे देखील विकू शकता अथवा आता कोरफड जेल जवळपास सगळ्या घरामध्ये वापरली जाते, यामध्ये व्यक्ती जेल काढून सुद्धा कमाई करू शकणार आहे.

– मधाचा व्यवसाय
मधमाश्या पाळण्याचा व्यवसाय देखील व्यक्ती सुरू करू शकणार आहे. फक्त १ ते १.५ लाख रुपये खर्च करून देखील व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करू शकणार आहे. मात्र, हा व्यवसाय चालविण्यासाठी त्या व्यक्तीला प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

– भाजीपाल्याची शेती
व्यक्ती भाजीपाला पिकवून देखील चांगले उत्पन्न मिळवू शकणर आहे. त्या व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी अधिक जागेची देखील आवश्यकता नाही. या प्रकारच्या शेतीसाठी सरकार देखील मदत करत आहे. या शेतीत व्यक्ती बंपर कमाई करू शकणार आहे.

– दुधाचा व्यवसाय
व्यक्तीकडे गाय अथवा म्हशी असल्यास तेव्हा ती व्यक्ती दुधाचा व्यवसाय सुरू करू शकते. गाय अथवा म्हैस नसेल तर त्या व्यक्तीला तीस हजार रुपयांपर्यंत गाय मिळणार आहे. त्याचप्रमाणे १ म्हैस ५० ते ६० हजारांपर्यंत मिळते. त्यावेळी ती व्यक्ती स्वतः व्यवसाय २ गायी अथवा म्हशींनी सुरू करू शकणार आहे. तसेच यामध्ये व्यक्ती, दूध डेअरी अथवा कंपन्यांशी करार करू शकणार आहे.

– फुलांचा व्यवसाय
व्यक्ती फुलांचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकणार आहे. सध्याच्या कालावधीत लग्नापासून लहान कार्यक्रमांपर्यंत फुलांची आवश्यकता भासत आहे. यावेळी चांगल्या फुलांची मागणी खूप अधिक आहे. याव्यतिरिक्त व्यक्तीने ऑनलाईन फुले देखील विकू शकणार आहे. तसेच, सूर्यफूल, गुलाब, झेंडूची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे.

– कुक्कुटपालन व्यवसाय
कुक्कुटपालन हा असा व्यवसाय ज्यासाठी व्यक्तीला थोडी गुंतवणूक करावी लागणार आहे. आता सरकारकडून मुद्रा कर्ज मिळते. ज्या माध्यमातुन व्यक्ती कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकते.