‘म्युझिक व्हिडीओतून केली होती करिअरला सुरुवात’ : सोनू सूद

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड(Bollywood) स्टार सोनू सूद (Sonu Sood) याचा पागल नहीं होना हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच रिलीज झाला. या व्हिडीओत तो अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर सुनंदा शर्मा (Sunanda Sharma) सोबत दिसला. सोनूनं नुकताच एक खुलासा केला आहे की, त्यानं एका म्युझिक व्हिडीओमधूनच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती.

सोनू म्हणाला, मी अ‍ॅक्टर म्हणून एका म्युझिक व्हिडीओमधून माझ्या करिअरला सुरुवात केली होती. गुरदास मानच्या या व्हिडीओचं नाव होतं जादुगरी. यानंतर त्यानं सुरजीत सिंह बिंद्राखियाच्या जाट की पसंद या म्युझिक व्हिडीओत काम केलं.

सोनू म्हणाला की, मला पंजाबी सिनेमात काम करण्याची इच्छा होती. परंतु एक फुल लेंथ फीचर फिल्म करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळं या म्युझिक व्हिडीओसाठी मी लगेचच होकार दिला. कारण याला चांगला आवाज होता आणि सशस्त्र दलांसाठी एक पावरफुल मेसेज होता. मी यात काम केल्याचा मला आनंद आहे. हा एक आनंददायक अनुभव होता.

सोनू असंही म्हणाला की, हे गाणं एका सैनिकाबद्दल आहे जो आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून बॉर्डरवर शत्रुशी लढायला जातो. हे तसं आहे जसं मला हवं होतं. मला आशा आहे की, आमचे बहादुर जवान याला रिलेट करू शकतील. जो कुणी देशासाठी लढतो त्याला आपल्या प्रियजणांना मागे सोडून जावं लागतं.