प्रेमासाठी काय पण ! तिच्यासाठी प्रियकरानं चक्क पैसे छापण्याचा कारखानाच टाकला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम अंधळ असतं असे म्हटले जाते. प्रेमामध्ये लोक वाट्टेल ते करतात. प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी तिला महागड्या गाडीवर फिरवण्यासाठी चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना औरंगाबदमध्ये घडली आहे. या बहादराने प्रेयसीला खूष करण्यासाठी आणि तिला गिफ्ट देण्यासाठी, तिचे लाड पुरवण्यासाठी त्याने चक्क पैसे छापण्याचा कारखाना टाकला. तोही नकली नोटा छापण्याचा कारखाना. त्यांच्या या कृतीमुळे पोलीस देखील चक्रावून गेले.

औरंगाबादचा शेख समराणा असे या प्रेमविराचे नाव आहे. त्याने प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी राहत्या घरामध्ये पैसे छापण्याचा कारखाना सुरु केला. शेख समराण हा बीएसीएसचं शिक्षण घेतो. कॉलेजमध्ये त्याचं एका तरुणीशी प्रेम जुळलं. त्याची प्रेयसी रोज काही ना काही मागण्या करायची. पण त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने युट्युबच्या माध्यमातून नकली नोटा छापायचं शिकला. घरच्या घरी नोटा छापायचं मशीन टाकलं. त्या नोटांचा वापर करून तो प्रेयसीला गिफ्ट घ्यायचा. तिच्यासोबत मौजमजा करायचा.

सुरुवातीली त्याने ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही किंवा भाजी मंडईतील छोट्या-मोठ्या टपऱ्यांवर तो या नोटा देऊन पैसे सुट्टे करुन घेत होता. त्यासाठी तो कमी शिकलेल्या लोकांना हेरत होता. त्यासाठी तो रात्री हे पैसे सुट्टे करुन घेत होता. प्रेयसीचे लाड पुरवत असताना तो पोलिसांच्या नजरेत आला. पोलिसांनी त्याला दोन साथीदारांह अटक केली. पुढील तपास औरंगाबाद पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like