नगर : लॉ कॉलेज ते निलक्रांती चौकातील गटार साफ करण्यास सुरूवात

दिल्ली गेट ते चौपाटी करांना रस्ता रुंदीकरणाबाबत पाहणी

अहमदनगर : न्यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौकापर्यंत गटार साफ करण्यास महापालिका प्रशासनाने आज दुपारी सुरुवात केली आहे. तसेच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या कामाची सुरूवात केल्यानंतर दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा रस्ता रुंदीकरणाबाबत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नुकत्‍याच झालेल्‍या पावसाचे पाणी न्‍यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौकापर्यत साचून राहिले होते त्‍यामुळे त्‍या भागातील वसाहतीमध्‍ये पाणी जमा झाले होते. याकरिता सदर भागाची पाहणी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व मा.आयुक्‍त श्री.श्रीकृष्‍ण भालसिंग यांनी केली. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, उपायुक्‍त श्री.प्रदिप पठारे, शहर अभियंता श्री.सोनटक्‍के, अभियंता श्री.बल्‍लाळ, श्री. इथापे, मुख्‍य स्‍वच्‍छता निरिक्षक श्री. अन्‍वर शेख नगरसेवक मा.श्री.दिप चव्‍हाण, मा.श्री. धनंजय जाधव, मा.श्री;अजय साळवे, मा.सौ.कालिंदीताई केसकर, मा.श्री.अजय चितळे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.गिरीष जाधव, मा.श्री.सुनिल पारधे, मा.श्री.पुष्‍कर कुलकर्णी , मा.श्री. निलेश जाधव, मा.श्री.अमोल वाकळे, मा.श्री.शिवा आढाव, आदी उपस्थितीत होते.

यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, या भागात पावसाचे पाणी मोठया स्‍वरूपात वाहून येत असल्‍यामुळे पाण्‍याचा प्रवाह मोठा असतो. सदरचा रस्‍ता शहरात जाणारा मुख्‍य रस्‍ता आहे. नुकत्‍याच झालेल्‍या पावसामुळे या भागात पाणी साचून राहिल्‍यामुळे नागरिकांना जाण्‍या येण्‍यास त्रास होतो.याकरिता या भागाची पाहणी करून न्‍यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौका पर्यत गटर साफ करण्‍याच्‍या कामास सुरूवात करण्‍याचे आदेश दिले. त्‍याप्रमाणे तातडीने जेसीबी लावून कामास सुरूवात करण्‍यात आली. दिल्‍लीगेट ते न्‍यू आर्टस कॉलेज पर्यतचा रस्‍ता मा.मुख्‍यमंत्री साहेब यांच्‍या निधीमधून मंजूर असून त्‍यामध्‍ये साईड गटर देखील मंजूर आहे. त्‍या कामाचा कार्यारंभ आदेश देण्‍यात आलेला असून त्‍यापैकी गटारीचे काम तातडीने सुरू करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. तसेच आतील वसाहतीमध्‍ये असलेल्‍या शौचालयाची पाहणी केली. याबाबत शौचालय तातडीने दुरूस्‍त करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. निलक्रांती चौक ते दिल्‍लीगेट ते सिना नदी पर्यत असलेल्‍या गटारीवरील चेंबर वरील जाळया साफ सफाई करून घेण्‍यात याव्‍यात. त्‍यामुळे पावसाचे पाणी त्‍या चेंबर मधून जाण्‍यास मदत होईल.

तसेच दिल्‍लीगेट ते चौपाटी कारंजा रस्‍ता रूंदीकरणाबाबत पाहणी करण्‍यात आली. यावेळी रस्‍तास बाधीत होणा-या मालमत्‍ताधारकांना नोटीसा देवून पुढील योग्‍य ती कार्यवाही करण्‍याबाबत सुचना दिल्‍या. पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये हा रस्‍ता रूंदीकरण झाल्‍यास या रस्‍त्‍यावरील बरीसची वाहतुक कोंडी सुटण्‍यास मदत होईल. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे यांनी सांगितले की, निलक्रांती चौक ते दिल्‍लीगेट ते नेप्‍तीनाका पर्यत असलेल्‍या गटारीवरील चेंबर पूर्णपणे झाकण्‍यात आलेल्‍या आहेत त्‍यामुळे पावसाचे पाणी वाहुन जाण्‍यास अडथळा निर्माण झाला आहे. या गटारीवरील सर्व चेंबरची उंची वाढवून पाणी जाण्‍यासाठी जाळया बसविण्‍यात याव्‍यात अशा सुचना दिल्‍या.

आरोग्याविषयक वृत्त

प्रसूतीनंतर या ” कारणामुळे ” गळतात केस

दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी

#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

सिने जगत

अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘मोगरा फुलला’ तर अभिनेत्री तापसीचा पन्नूचा ‘गेम ओव्हर’

‘पेहचान कौन’ ! ‘या’ दोन सौंदर्यवती आहेत दिग्गज अभिनेत्यांच्या मुली

You might also like