दोन इंजिनिर्सची ‘भन्‍नाट’ आयडिया, ‘घरपोच’ चहा देत बनले ‘कोटयाधीश’

नवी दिल्ली : ऑनलाईन – शिक्षण घेऊन देखील नोकरी नसणारे तरुण आपल्या देशात अनेक आहेत. काही नोकरी नसल्याने मानसिकरित्या खचत आत्महत्या करण्याचा देखील विचार करत असतात. मात्र लखनऊ मधील दोन उच्चशिक्षित तरुणांनी आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत चहाचे दुकान सुरु करून या तरुणांसमोर आदर्श उभा केला आहे. या दोन उच्चशिक्षित तरूणांनी चहाची होम डिलिव्हरी करण्याचा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्यांच्या या स्टार्टअपने कोट्यवधींची उड्डाने घेतली आहेत. पिझ्झा आणि इतर खाद्यापदार्थाप्रमाणे त्यांनी देखील चहाची होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांच्या या स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा या दोघांनी मिळून ‘चाय कॉलिंग’ नावानं चहाची होम डिलीव्हरी सुरू केली. अल्पावधीतच त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. यामधून सध्या त्यांना वर्षाला दोन कोटी रूपये मिळतात. सध्या त्यांच्या संपूर्ण उत्तर प्रदेशात या दुकानाच्या १५ शाखा आहेत. हे दोन तरुण एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र दररोज ऑफिसमधील कंटाळवाणा चहा पिऊन कंटाळलेल्या या तरुणांनी चहाचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानंतर या दोघांनी ‘चाय कॉलिंग’ नावाचे चहाचे दुकान सुरु केले. त्यामध्ये त्यांनी १० ते १५ मिनिटांत चहाची डिलिव्हरी देण्याची व्यवस्था सुरु केली.

दरम्यान, यासाठी त्यांनी ‘चाय कॉलिंग’ नावाची एक वेबसाईट सुरु केली. त्यानंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढीस लागला. २०१४ साली त्यांनी आपल्या पहिल्या दुकानाची स्थापना केली होती.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

 या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

 “पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

 फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

सिनेजगत

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !