Startup India : PM मोदींनी ‘स्टार्टअप’साठी 1 हजार कोटीच्या फंडाची केली घोषणा, युवकांना दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.16) स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला संबोधित करताना तरुणांना स्टार्टअपला प्रथम प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापूर्वी जर एखाद्याने स्टार्टअप सुरु केले तर लोक म्हणत होते की, तुम्ही नोकरी का करत नाही, स्टार्टअप्स का करता ? मात्र आता लोक म्हणतात की नोकरी ठीक आहे, पण स्टार्टअप्स का करत नाही. हा बदल बिम्सटेक देशांची एक मोठी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम देश आहे. देशात 41 हजारापेक्षा अधिक स्टार्टअप्स आहेत. त्यापैकी आयटी क्षेत्रात सुमारे 5700 स्टार्टअप्स आहेत. आरोग्य क्षेत्रात 3600 आणि कृषी क्षेत्रात 1700 स्टार्टअप्स आहेत. हे सर्व व्यवसाय डेमोग्राफिक चित्र बदलत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशात नवीन स्टार्टअप्स विकसित करण्यासाठी आम्ही एक हजार कोटींचा स्टार्टअप इंडिया इंडिया सीड फंड सुरु करीत आहोत. आम्ही एक स्टार्टअप सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत जी ‘तरुणां’द्वारे, ‘तरुणां’साठी या मंत्रावर आधारित आहे.