PM मोदींच्या ‘या’ योजनेमुळं 20 हजार युवक बनले त्यांच्या कंपनीचे ‘मालक’, 2 लाख बेरोजगारांना दिला ‘रोजगार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे केलेले आवाहन तरुणांना रुचले असून २०१५ पासून आतापर्यंत २० हजार युवकांनी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून स्वतःची कंपनी सुरु केली आहे. त्याचबरोबर या तरुणांनी आतापर्यंत २ लाख तरुणांना रोजगार देखील या व्यवसायाच्या माध्यमातून दिला आहे. अनेक नवीन कंपन्या तसेच नवीन व्यवसाय या तरुणांनी सुरु केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात १९,८७४ नोंदणीकृत स्टार्टअप कंपन्या आहेत. या माध्यमातून २ लाख १२ हजार ८०९ तरुणांना रोजगार देखील मिळाला आहे.

स्टार्टअपला मिळतात अनेक प्रकारच्या सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये स्टार्टअप इंडिया या योजनेची सुरुवात केली. या माध्यमातून युवा तरुणांना रोजगार देण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय देखील सुरु कारण्याची मोठी संधी आहे. या माध्यमातून तरुणांना या व्यवसायात पहिल्या ३ वर्षात कोणताही कर लागत नाही त्याचबरोबर ३ वर्ष तुमच्या कंपनीची कोणत्याही प्रकारची चौकशी देखील होत नाही.

केंद्र सरकारने ‘स्टार्टअप मूव्हमेंटच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले होते. आयबीएम कंपनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतात अनेक स्टार्टअप हे सुरुवातीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातच बंद पडतात. या व्यवसायात गुंतवणूकदार न मिळणे आणि या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध नसणे हे यामागील मोठे कारण आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत देखील काही कंपन्या चांगला कारभार करत असून त्यांनी अनेक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.

या राज्यात आहेत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप

१) सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्र्रात असून जवळपास ३ ७६१ कंपन्या असून यामार्फत ३९ हजार ७७१ जणांना रोजगार मिळाला आहे.

२) दुसऱ्या स्थानावर कर्नाटक असून राज्यात २९१९ कंपन्या असून यामार्फत ३५ हजार ६२२ जणांना रोजगार मिळाला आहे.

३) तिसऱ्या स्थानावर दिल्ली असून राज्यात २६१६ कंपन्या असून यामार्फत २७ हजार २७१ जणांना रोजगार मिळाला आहे.

४) चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेश असून राज्यात १६०७ कंपन्या असून यामार्फत१५ हजार ४१९ जणांना रोजगार मिळाला आहे.

५) पाचव्या स्थानावर तेलंगणा असून राज्यात ११०३ कंपन्या असून यामार्फत १३ हजार ७९१ जणांना रोजगार मिळाला आहे.

६) सहाव्या स्थानावर हरियाणा असून राज्यात १०८६ कंपन्या असून यामार्फत १४ हजार १३४ जणांना रोजगार मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –