मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममुळं 23 हजार लोक झाली कंपनीचे मालक, PM च्या आवाहानाचा झाला ‘परिणाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करून मालक व्हा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांना आवाहन केले होते. याच आवाहनामुळे 2015 पासून ते आतापर्यंत 23 हजार तरुण आपल्या स्वतःच्या कंपनीचे मालक झालेले आहेत.

20 हजारांहून 23 हजारांवर पोहचले स्टार्टअप
उद्योग मंत्रालयाच्या मागील आकडेवारीनुसार मागच्या वर्षीपर्यंत 20 हजारांपेक्षा कमी स्टार्टअप्स होते. परंतु मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार तरुण नवीन कल्पना घेऊन कंपनी सुरू करत आहेत. एवढेच नव्हे तर आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर स्टार्टअप इंडिया मोहिमेचे हेच चित्र समोर आले आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या देशात 23 हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत आणि या प्रत्येकाने कमीत कमी 12 लोकांना रोजगार दिला आहे.

केंद्र सरकारणकडून एका स्टार्टअपसाठी दिली जाते इतकी सूट
पीएम मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. या योजनेंतर्गत केवळ तरुण उद्योजक तयार करणे नव्हे तर तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या हा उद्देश देखील होता. सरकारने यासाठी सुरुवातीपासूनच 10 हजार कोटींचा निधी स्थापित केला आहे. याअंतर्गत, तरुण उद्योजकांना तीन वर्षांच्या करातून सूट देण्यात आली आहे.

परदेशी गुंतवणूक देशात वाढावी यासाठी सरकार अनेक कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. ‘स्टार्टअप मूवमेंट’ हा त्यातीलच एक भाग मानला जात आहे. 2017 मधील एका अहवालानुसार भारतात उद्योगांसाठी भांडवलाची उपलब्धता न होणे याचे हे देखील एक कारण आहे की अनेक उद्योग पाच वर्षांपेक्षा जास्त चालताच नाहीत. असे असूनही सध्या तयार असलेल्या स्टार्टअपद्वारे अनेक लोकांना रोजगार दिले आहेत.

या ठिकाणी आहेत जास्त स्टार्टअप आणि रोजगार
महाराष्ट्रत 3,761 स्टार्टअप तयार झाले आहेत आणि त्यात 49,482 लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच इतर राज्यांची देखील आकडेवारी आहे.

कर्नाटक – 2,919 स्टार्टअप, 38,828 लोकांना रोजगार

दिल्ली – 2,616 स्टार्टअप, 36,403 लोकांना रोजगार

उत्तर प्रदेश – 1,607 स्टार्टअप, 22,815 लोकांना रोजगार

हरियाणा – 1,086 स्टार्टअप, 17,182 लोकांना रोजगार

तेलंगाना – 1,103 स्टार्टअप, 19,181 लोकांना रोजगार

Visit : Policenama.com