दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातील स्टार्टअप्सला देणार प्रोत्साहन-मुख्यमंत्री 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- तंत्रज्ञानावर आधारित दुष्कृत्य करणाऱ्या शक्तींना आळा बसवण्यासाठी सकारात्मक शक्तीचे संघटन करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे. दहशतवादाला नामशेष करण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या स्टार्टअप योजनांना प्रोत्सहन देण्याचे काम आम्ही येत्या काळात करणार आहोत. असे देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले आहे.  महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या  वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित  परिसंवादात मुख्यमंत्री अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पोलीस महासंचालनालयाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलिस महासंचालक पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांच्यासहित वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते. निवृत्त पोलीस अधिकारी आलोक जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ  कॉफ्लिक्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजय सहानी यांनी या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे पोलीस दल आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या सारख्या दहशतवाद प्रविष्ठ शहरांची सुरक्षा पोलीस दलाने अत्यंत सक्षमपणे हाताळली आहे. सायबर स्पेस आणि दहशतवादाला उत्तेजन देणाऱ्या कार्यवाह्या समाज माध्यम आणि तशाच तत्सम माध्यमातून लढाया लढल्या जातील.  त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तशाच किंबहुना त्यापेक्षा सरस तंत्रज्ञानाची आपणाला आवश्यकता आहे. याच्या निर्मिती साठी आपण प्रयत्नशील आहोत. मुंबई पोलिसांनी आर्टिफिशीयल इंटलेजीन्सवर आधुनिक प्रणाली वापरण्यास सुरुवात केली आहे.  अन्य क्षेत्रात हि अशाच पद्धतीचे काम करणाऱ्या प्रणालीचा उदय होतो आहे. अशाच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्सला सुरक्षेतील संशोधनासाठी काम करायचे असल्यास आम्ही त्याला  प्रोत्साहन देणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

२६/११ च्या हल्ल्या  नंतर महाराष्ट्र्र पोलीस दलाने दहशतवादाच्या विरोधात ठोस पावले उचलली असून दहशतवादी विरोधी पथकात आमूलाग्र बदल घडल्याचे आता पाहण्यास मिळते आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या आजच्या कार्यक्रमात सुरक्षा विषयावर अत्यंत सखोल चर्चा करण्यात आली आहे.