केजरीवालांच्या शपथविधीला बेबी ‘मफरलमॅन’ला देखील खास आमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण समारंभ येत्या 16 फेब्रुवारीला होत आहे. तिसऱ्या वेळी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्या शपथग्रहण सोहळ्याची जय्यत तयारी आपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

केजरीवालांचे ट्विट करून आमंत्रण
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. तसेच तुमचा मुलगा तिसऱ्यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री होत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी अवश्य या. या बरोबर अरविंद केजरीवाल यांनी या कार्यक्रमासाठी एका व्यक्तीला खास निमंत्रण दिले आहे. आम आदमी पक्षाने विजय मिळवल्यानंतर एक मुलगा केजरीवाल यांचा पेहराव करून विजय उत्सावात सहभागी झाला होता. या मुलाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. या लहान मुलाचे नाव आवयान तोमर असून अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून या लहान मुलाला खास आमंत्रण दिले आहे.

आम आदमी पार्टीच्या ट्विटर हँडलवर लिहण्यात आले आहे की, ‘अनाऊंसमेंट : बेबी मफलरमॅनला अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.’ दिल्ली निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी या एक वर्षाच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. ज्यूनिअर केजरीवालच्या नावाने तो प्रसिद्ध झाला होता. त्याने हुबेहुब अरविंद केजरीवाल यांचा लूक बनवला होता. त्याने साधा स्वेटर, मफलर आणि चश्मा लावून आला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like