State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, १० टक्के मराठा आरक्षणाचा होऊ शकतो कायदा

मुंबई : State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. आयोगाने या अहवालात मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब केले आहे. आता मराठा समाजास शिक्षणात आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात संमत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (State Backward Classes Commission On Maratha Reservation )

या अहवालानुसार विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजास १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला जाऊ शकतो. यापूर्वी देखील दोन वेळा अशाप्रकारे कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते, पण मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध केले नसल्याने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नव्हते. आता मात्र आयोगाने तसा अहवाल दिला असल्याने आरक्षण टिकण्याची शक्यता आहे.

आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात
घेतलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
या अहवालात मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब केले आहे.
आता या अहवालाच्या आधाराने मराठा समाजास शिक्षणात आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात मांडले जाईल.
तसेच कुणबी नोंदी सापडेल्यांना कुणबी दाखले देण्याबाबत अधिवेनात चर्चा होऊ शकते.

मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यांत १२ टक्के, तर शिक्षणात १३ टक्के आरक्षण लागू केले होते.
या धर्तीवरच १२ आणि १३ टक्के आरक्षण द्यावे, असा प्रस्ताव आहे. कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावे या उद्देशाने
१० टक्क्यांच्या आसपास आरक्षण द्यावे, असा सरकारचा प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाने अहवाल स्वीकारल्यावर किती
टक्के आरक्षण द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल. १० ते १२ टक्के या प्रमाणात आरक्षणाचा कायदा होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई

Pune Cheating Fraud Case | ज्येष्ठ दाम्पत्याची 60 लाखांची फसवणूक, 6 जणांवर MPID